Anna Bansode, Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Anna Bansode News : अजितदादांचा कट्टर समर्थक आमदाराच्या कार्यालयात थेट मुख्यमंत्र्यांची 'एन्ट्री' ! चर्चांना उधाण...

CM Shinde Meets Anna Bansode : अण्णा बनसोडे काय भूमिका घेणार ?

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde Visit Anna Bansode : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे विरोध पक्षनेते अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. बनसोडे यांनीही अजितदादा घेतील ती भूमिकेला डोळे झाकून पाठिंबा देणारा कार्यकर्ता असल्याचे वारंवार सांगितले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी (ता. १६) आमदार बनसोडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमात एकत्र दिसून आले. यावेळी बनसोडे यांच्या गळ्यात भगवी शाल आढळली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेत (Shivsena) फूट पडली आणि राज्यात सत्तांतर झाले. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले. या नेत्यांसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेना जवळ केली.

गेल्या वर्षभरात सुरू असलेले शिवसेनेतील 'इनकमिंग' अद्यापही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर बनसोडे आणि मुख्यमंत्री शिंदे एकत्र आले. यानंतर बनसोडे यांच्या कार्यालयालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. त्यामुळे आगामी काळात आमदार बनसोडे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. 'पहाटेच्या शपथविधी'चे बनसोडे साक्षीदार आहेत. दरम्यान, अजितदादा नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राज्यात चर्चा सुरू होती. त्यावेळीही बनसोडे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना उघडपणे पाठिंबा दिला होता.

दरम्यान, आज मुख्यमंत्री शिंदे व बनसोडे एकत्र दिसून आले. यावेळी बनसोडे यांनी भगवी शाल घेतली होती. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. यामुळे बनसोडे आगामी काळात शिवसेनेच्या वाटेवर तर नाहीत ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता बनसोडे राजकीय दृष्टीने काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या चर्चांना काही अर्थ नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यामांशी बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ही सदिच्छा भेट आहे. अण्णा बनसोडे हे चांगले कार्यकर्ते आहेत. ते या परिसरात लोकप्रिय आहे. मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे सर्व पक्षाचे आमदार येतात. त्यांना मी सढळ हाताने मदत करतो."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT