Chandrashekhar Bawankule News : उद्धव ठाकरेंसाठी आमचे सगळे दरवाजे बंद !

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही प्रगल्भ नेते आहेत.
Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

All our doors are closed for Uddhav Thackeray : कुणीतरी एक जाहिरात दिली त्यावरून काहीतरी चर्चा होत आहेत. काहींनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही प्रगल्भ नेते आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी, राज्याला नंबर वन बनविण्यासाठी ते अशा लहान-मोठ्या गोष्टींना थारा देणार नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Both Fadnavis and Eknath Shinde are profound leaders)

नागपुरात आज (ता. १६) पत्रकारांशी आमदार बावनकुळे बोलत होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर राज्यभर एकच गोंधळ उडाला. शिंदेंच्या या जाहिरातीमुळे भाजप आणि फडणवीसही दुखावले होते. याबाबत विचारले असता, जाहिरातीमुळे कुणाची उंची किंवा महत्व कमी होते, असे काही नाही.

दोन्ही नेते मनाने एक आहेत. यामध्ये केंद्र सरकारला मध्ये आणण्याचे काही एक कारण नाही. कारण केंद्रातील नेते कधीही कुणाचे महत्व कमी करत नाही. नाही तर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला प्रदेशाचे अध्यक्षपद दिले नसते. पक्षामध्ये सर्व समान आहेत, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

'शासन आपल्या दारी’ उपक्रमाबाबत बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम प्रत्येकाच्या दारी गेला पाहिजे. या राज्यातील प्रत्येक व्यक्ती केन्द्र सरकार व राज्य सरकारने राबवलेल्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी या योजनेवर खर्च केलाच पाहिजे. नाही तर योजना ढीगभर पण लोकांच्या कामी एकही येत नाही, असे व्हायला नको. म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule News : ‘हे’ उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? त्यांनी लंडनमधून व्हिडिओ पाठवावा !

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी आमचे सगळे दरवाजे बंद आहेत. आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नाही आणि भविष्यात करणारही नाही. पण उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक (Karnataka) सरकारवरच्या भूमिकेवर त्यांचे म्हणणे काय, हे सांगणे गरजेचे आहे. नसेल सांगणं होत तर त्यांच्या मुखपत्रातून तरी त्यांनी भूमिका मांडावी, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com