Eknath Shinde, Girish Bapat Sarkarnama
पुणे

Girish Bapat Passed Away: सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला : मुख्यमंत्री

Girish Bapat Passed Away Cm Eknath Shinde's Reaction: दिलदार नेता आज आपल्यातून गेल्याचं दुखं होतय”,

सरकारनामा ब्यूरो

Girish Bapat Passed Away: पुण्याचे भाजप (BJP) खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने आज निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्यानं राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे.

 “ही अतिशय दुख:द बातमी आहे. आपण एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. गिरीष बापट हे गेली अनेक वर्ष सक्रीय राजकारणात होते. त्यांच्या कारकीर्द नगसेवकापासून सुरू झाली. पुढे ते मंत्रीही आणि खासदारही झाले. मंत्रीमंडळात काम करताना आम्ही शेजारीच बसत होतो. त्यांच्या निधनाने भाजपाची तर हानी झालीच, पण आपण एक सच्चा लोकसप्रतिनिधी गमावला आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

“पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा दिलदार नेता आज आपल्यातून गेल्याचं दुखं होतय”, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

“दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातीलच नव्हे, तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकीत व्हायचो. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला”, असही ते म्हणाले.

दरम्यान, काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती.

SCROLL FOR NEXT