Pune News : पुण्यातील नामांकित रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. राजकीय राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत.
हे प्रकरण समोर आल्यानंतर शुक्रवारी तब्बल 15 पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयासमोर येत प्रशासनाचा निषेध नोंदवला. भाजप (BJP) महिला आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत एक हॉस्पिटलमध्ये तोडफोड देखील केली आहे. त्यानंतर शनिवारी देखील रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरूच आहेत. दरम्यान, काही आंदोलकांनी रुग्णालयाच्या इमारतीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या असून आंदोलन करणाऱ्या संघटनांना त्यांनी चांगलंच ठणकावले.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) म्हणाले, 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असल्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काही एसओपी निर्माण झाल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे.'
नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये बदल करून धर्मादाय आयुक्तांना नुकतेच काही अधिकार देण्यात आले आहेत. सर्व धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाइनच्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्मवर यावी, असा आमचा प्रयत्न आहे. ज्या माध्यमातून कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड आहेत? किती दिले गेले आहेत आणि ते दिले जात आहेत का? नाही या सर्व गोष्टींची एका ठिकाणावरून मॉनिटरिंग करता येईल. त्यासोबतच मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष या यंत्रणेशी जोडण्याचा आमचा मानस असून जेणेकरून या सर्व गोष्टींवर दबाव राहील, असा आमचा प्रयत्न असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबानी मोठ्या मेहनतीतून उभारला आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी या हॉस्पिटलच्या वाईट आहेत, असे म्हणता येणार नाहीत. मात्र झालेला प्रकार हा असंवेदनशील होता. त्यामुळे जिथे चूक असेल तिथे चूक म्हणावेच लागेल. जर हॉस्पिटल प्रशासन ती चूक सुधारत असेल तर त्याचा मला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.
शनिवारी या हॉस्पिटलच्या टेरेसवरून जाऊन आंदोलन सुरू असून असले प्रकार करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणाची सरकारने दखल घेतली असून जी काही योग्य कायदेशीर कारवाई असेल, ती करण्यात येईल. मात्र शो बाजी करणे बंद झाले पाहिजे. भाजप महिला आघाडीकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली हे चुकीचे आहे. ती महिला आघाडी भाजपची असो वा इतर कोणत्याही पक्षाची अशा प्रकारे तोडफोड करणे अत्यंत चुकीचे, असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करता येईल, याची स्पष्टता येणार नाही. त्यामुळे अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कालपर्यंत समजू शकत होतो की लोकांमध्ये राग होता. त्यामुळे आंदोलन सुरू होती. मात्र, आता काही लोक शो बाजी करत आहेत, ती त्यांनी केली नाही पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.