Ajit Pawar Vs Sharad Pawar : पवार काका-पुतणे आणखी एका मैदानावर लढणार; अखेर छत्रपती कारखान्याची निवडणूक जाहीर

Ajit Pawar-Sharad Pawar : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar vs Sharad Pawar News : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमने-सामने येणार आहेत.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 7 ते 15 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 16 एप्रिलला अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 2 मेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 5 मे रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर 18 मे रोजी मतदान आणि 19 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

पाच वर्षांनंतर निवडणूक जाहीर :

छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 11 मे 2020 रोजी संपृष्टात आली आहे. मात्र, मात्र कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह अनेक सभासदांनी कारखान्याला सलग ऊस पुरवठा न करणारे सभासद, थकबाकीदार सभासद यांच्यासह अक्रियाशील सभासदांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Ajit Pawar-Sharad Pawar
Sharad Pawar Politics : दिल्लीत बैठक, शरद पवारांचा आजी-माजी खासदारांना कानमंत्र; पक्षविस्तारासाठी...

न्यायालयातील ही याचिका आणि त्यानंतर कोरोनामुळे ही निवडणूक सातत्याने पुढे ढकलली जात होती. कारखान्याची अंतिम यादी आतापर्यंत चार वेळा प्रसिद्ध झाली. मात्र ही यादी सदोष असल्याचा आरोप होत होता. नुकताच उच्च न्यायालयाने सत्ताधारी गटाच्या बाजूने निकाल देत जाचक यांना धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. मात्र त्यापूर्वीच कारखान्याची निवडणूक तातडीने जाहीर करण्यात आली आहे.

शरद पवार-अजित पवार पुन्हा आमने-सामने :

या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने येणार आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखाना हा इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवर आहे. दोन्ही तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव राखून असणारा हा साखर कारखाना आहे. संपूर्ण इंदापूर तालुका आणि बारामतीमधील 53 गावे हे छत्रपती साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे.

गेली अनेक वर्षांपासून कारखान्यावर पवार घराण्याच्या विचाराची सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांची राजकीय कारकिर्द ही छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून झालेली आहे. त्यामुळे या दोघांचे छत्रपती कारखान्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह विद्यमान संचालक मंडळाने अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या कारखान्यावर सध्या अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar : पक्षाची 'इमेज' सुधारण्यासाठी अजितदादा ताकही फुंकून पिणार; राष्ट्रवादीत भाजपची संस्कृती रुजवणार!

अशात लोकसभेतील विजयानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती कारखान्याची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आप्पासाहेब पवार असताना कारखाना चांगला चालवत होते. एक नंबरचा कारखाना होता. आता काय झालं माहित नाही. उद्याची कारखान्याची निवडणूक तुमच्या संसाराची निवडणूक आहे, त्यात लक्ष घालावेच लागेल. काही नेते मंडळींनी कारखाने हातात ठेवले, हे सगळे दुरूस्त करायचे असेल तर आपल्याला एकत्र रहावे लागेल, असे शरद पवार यांनी सांगितेल होते.

तर छत्रपती कारखान्याची निवडणूक लढवायची, जिंकायची आणि कारखाना रूळावर आणायचा असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी छत्रपती कारखान्यात लक्ष घालणार असल्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी बारामतीसह राज्यात आपला डंका वाजवला. महायुतीची सत्ता स्थापन होऊन ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहे. त्यामुळे आता या लढाईत कोण जिंकणार? हे येत्या दीड महिन्यात स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com