Pune Congress News : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शनिवारी ते पहिल्यांदाच पुण्यात आले होते. एकेकाळी कॉंग्रेचा गड राहिलेल्या पुण्यात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. सद्य स्थितीस पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा एकही निवडून आलेला आमदार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये नवसंजीवनी फुंकण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी शनिवारी पुण्यात अनेक बैठकांचं आयोजन केलं होतं.
गेले काही दिवसांपासून महाविकास आघाडीला(MVA) गळती लागल्याचे पाहायला मिळत आहेत काँग्रेससह आघाडीतील इतर पक्षांमधील नेते महायुतीची वाट धरत आहेत. त्यातलाच एक म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे आहेत. काँग्रेसमधून दोन वेळेस विधानसभा तर एक वेळेस लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर देखील त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा चांगलच धारेवर धरले आहे. रवींद्र धंगेकर यांचं नाव न घेता सपकाळ यांनी 'जिधर बम उधर हम', या संस्कृतीचा आपण धिक्कार केला पाहिजे असे म्हटले आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे(Congress) चिन्ह मिळणं हे खूप भाग्याचे लक्षण आहे. जे पंजा चिन्हावर निवडणूक लढवतात त्यांना एबी फॉर्म हातात आल्यावर त्यांच्या मनात पहिला भाव असतो की चला एकदा का होईना मला पंजा मिळाला. ही भावना काँग्रेसमधील प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि या पार्श्वभूमीवर जर एखाद्या व्यक्तीला तीन वेळा पक्षाचे चिन्ह मिळत असेल आणि तरी देखील तो पक्ष सोडून जात असेल तर ही निश्चितच दुर्दैवी गोष्टी आहे. असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ(Harshvardhan Sapkal) पुढे म्हणाले, त्यांनी पक्ष का सोडला याबाबत मी अधिक बोलणं योग्य नाही. माञ सत्ता, सत्ता आणि सत्ता हे राज्यातील बदललेलं गणित आहे. हे त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा पुढे आले आहे. त्यांनी देखील मी केवळ सत्तेसाठी जातो असं सांगितल आहे. म्हणजे विचाराची ऐशी की तैशी हाच त्यातला आशय आहे. या निमित्ताने 'जिधर बम उधर हम' ही संस्कृती येऊ पाहत आहे. त्याचा आपण धिक्कार केला पाहिजे. असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.
दरम्यान, रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर स्थानिक काँग्रेसने त्यांनी रवींद्र धंगेकर यांचा चांगला समाचार घेतला होता. स्थानिक काँग्रेस नेत्यांनंतर आता स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील रवींद्र धंगेकर यांचं नावं न घेता निशाणा साधला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.