BJP MLA Hemant Rasane : आमदारांनी छाती ठोकपणे सांगितलं शहराध्यक्षांनी उडवून लावलं!

BJP Pune Dheeraj Ghate MLA Hemant Rasane ban flex boards Kasba constituency : पुणे कसबा मतदारसंघात भाजप आमदार हेमंत रासने यांच्या फ्लेक्स न लावण्याच्या निर्णय शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी फ्लेक्स लावून मोडीत काढला आहे.
Hemant Rasane
Hemant RasaneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार हेमंत रासने यांनी कसबा मतदारसंघात कोणताही अनधिकृत फलक लावू देणार नाही, असं महिन्यापूर्वी छाती ठोकपणे सांगितलं होतं.

त्यानंतर महापालिका प्रशासनाला हाताशी घेत पेठेतील अनधिकृत फ्लेक्स आमदार रासने यांनी स्वतः हटवले होते. यानंतर रासने यांच्या निर्णयाचं मोठं कौतुक देखील झालं. मात्र या आमदारांच्या निर्णयाला पक्षाच्या शहराध्यक्षांनीच हरताळ फासला असल्याचे समोर आला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या अनधिकृत फ्लेक्सवर पुढील आठ दिवसात कारवाई करावी, अशा सूचना हेमंत रासने यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. रस्त्यांवर, चौकात उभारले जाणाऱ्या अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने यापुढे आपण स्वतः कसब्यात कोणताही अनधिकृत बॅनर लावणार नाही. तसेच इतरांनी सुद्धा हे बॅनर लावू नये, असे आवाहन भाजप (BJP) आमदार हेमंत रासने यांनी केले होते.

Hemant Rasane
Dinvishesh 22 March : काय घडलं होत त्यावर्षी आजच्या त्यादिवशी, वाचा आजचे दिनविशेष...

आमदार झाल्यानंतर सुरवातीपासूनच रासने यांनी मतदारसंघात स्वच्छतेवर भर दिला आहे. मतदारसंघ कसा स्वच्छ आणि सुंदर राहील याकडे रासने यांचा कटाक्षाने लक्ष आहे. याच अंतर्गत रासने यांनी स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियानांतर्गत क्लिन सिटी इंदौरचा दौरा स्वच्छता कर्मचाऱ्यांना (Workar) घेऊन केला होता. यानंतरच अनधिकृत फ्लेक्स बाबतचा निर्णय रासने यांनी जाहीर केला आणि महापालिका प्रशासनाला हाताशी घेऊन मतदारसंघातील अनधिकृत फ्लेक्स हटवले देखील होते.

Hemant Rasane
Ahilyanagar ZP CEO : ठरविकांचे फोन उचलणाऱ्या 'IAS'शी खासदार लंकेंचा पंगा; थेट मुख्य सचिवांकडे तक्रार

रासने यांच्या या निर्णयाला महिनाही उलटला नाही तोच, त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह इतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला हरताळ फासला आहे. धीरज घाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात लागले आहेत. त्यामुळे स्वतः हेमंत रासने जरी बॅनर लावत नसले, तरी भाजपचे उत्साही कार्यकर्ते मात्र बॅनरबाजी करत रासने यांच्या आवाहनालाचं आव्हान दिल असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रवादीने सुद्धा साधला निशाणा

भारतीय जनता पक्षाचे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील आमदार हेमंत रासने यांनी फ्लेक्स लावणार नाही, असे जाहीर केल्या नंतर विरोधी पक्षाने देखील या निर्णयाचे स्वागत केलं होतं. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या फ्लेक्सची जबाबदारी आमदारांनी घ्यायला हवी. आज मतदारसंघात काय दिसते? पक्षाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक हे सर्वत्र काही ना काही कारण शोधून अनधिकृत फ्लेक्स लावत आहेत. आमदार साहेब, याची आपण जबाबदारी घेणार आहात की नाही, असं म्हणतं शरदचंद्र पवार पक्षाने भाजपच्या या बॅनरबाजीवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com