Ramesh Chennithala  Sarkarnama
पुणे

Ramesh Chennithala : 'खरंच काम केलं की नाही हे..' ; रमेश चैन्नीथलांचा पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना इशारा!

Congress News : 'सर्व नियुक्त्या पूर्ण केल्या नाहीत व उपक्रमाची पूर्तता केली नाही तर कारवाई' असंही म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Pune News : 'लोकसभा निवडणुकीसाठी बूथ प्रमुखांच्या नियुक्ती पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून वारंवार सांगितले आहे. कोणाचे काम अपूर्ण असेल तर ते 5 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. तुम्ही खरेच काम केले आहे की नाही? ते प्रदेश पातळीवरून तपासले जाणार आहे. अपूर्ण काम करणाऱ्या ब्लॉक अध्यक्षांवर पक्षातर्फे शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.' असा इशारा काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी दिला.

पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याातील पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पुण्यात काँग्रेस भवन येथे पार पडली. चैन्नीथला यांनी जिल्हानिहाय बैठका घेत प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेच्या बांधणीचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड बैठक एकत्रित झाली. त्यामध्ये पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी बैठकीला सुरुवात करताना आढावा मांडला. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील काही नेत्यांची नावे घेत त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करा अशी मागणी केली. त्यानंतर चैन्नीथला यांनी हस्तक्षेप करत ही बैठक लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी नाही, पक्षाने इच्छुक उमेदवारांची नावे मागविली आहे. योग्य सक्षम व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल. या बैठकीत केवळ पक्ष संघटनेवरच चर्चा केली जाणार आहे असे स्पष्ट केले.

चैन्नीथला यांनी काही ब्लॉक अध्यक्षांना बैठकीमध्ये तुमच्या भागातील किती बुथवर कार्यकर्ते नेमले आहेत, किती शिल्लक आहेत याची चौकशी केली. ही माहिती खरी आहे असे मान्य करतो, पण 5 फेब्रुवारीनंतर प्रदेश काँग्रेसकडून तुम्हाला उपक्रम दिला जाणार आहे, तो पर्यंत तुम्ही सर्व नियुक्त्या पूर्ण केल्या नाहीत व उपक्रमाची पूर्तता केली नाही तर कारवाई केली जाईल असे बैठकीत सांगितले.

काँग्रेसच्या बैठकीत प्रभारी चैन्नीथला यांनी केवळ ब्लॅक अध्यक्षांकडून पक्षसंघटनेची माहिती दिली. यामध्ये कोणत्याही नेत्यांना भाषण करण्याची किंवा त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पक्ष संघटना, निर्णय प्रक्रिया, काही पदाधिकाऱ्यांची न पटणारी कार्यपद्धती याबाबत त्यांना बोलता न आल्याने पदाधिकाऱ्यांना त्यांची खदखद या नेत्यांपुढे मांडता आली नाही.

तर ‘प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी आज संघटनात्मक बांधनीचा आढावा घेतला.पुण्यातील सर्व नियुक्त्या झालेल्या आहेत. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत.’’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.

याशिवाय काँग्रेसभवन मध्ये पश्चिम महाराष्ट्राची बैठक होत असल्याने त्यासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांचा फोटो नव्हता. त्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. याची नोंद घेत यापुढे असे प्रकार होऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

(Editrd by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT