Congress Mahaarti sarkarnama
पुणे

Congress News : काँग्रेस कार्यकर्त्यांचा 'जय सियाराम'चा जयघोष, मंदिरात महाआरती

Ravindra Dhangekar : राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास झाल्याचा मोहन जोशींचा दावा

Sudesh Mitkar

Pune : एकीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला. मात्र, स्थानिक काँग्रेस नेते, कार्यकर्ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करत आहेत. पुणे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'जय सियाराम'च्या जयघोषात सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात महाआरती, भजन केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर (Ram mandir) लोकार्पण सोहळ्यानिमित्त माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi ) यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामांविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे प्रत्येक भारतीयाचे दैवत आहे. ते कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही. कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाहीत. या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला तरी ते भारतीयांना मान्य होणार नाही. प्रभू रामचंद्रांविषयी सर्वांच्या मनात आस्था आहे. याच भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती केली, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीरामाचा पक्षीय, राजकीय वापर करणाऱ्यांना रामरायानेच सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थनासुद्धा याप्रसंगी केल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास झालेला आहे. पण त्याचा कधीही राजकीय वापर करण्यात आला नाही, याचेही स्मरण मोहन जोशी यांनी करून दिले.

महाआरतीला आमदार रवींद्र धंगेकर, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, रोहित टिळक, शेखर कपोते, रमेश अय्यर, पूजा आनंद, रजनी त्रिभुवन, लता राजगुरू, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, प्रवीण करपे, स्वाती शिंदे, शानी नौशाद, नरेंद्र व्यवहारे, गौरव बोराडे, प्रथमेश आबनावे, चैतन्य पुरंदरे, रोहन सुरवसे, किशोर मारणे, अनिल आहेर आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT