Ayodhya Ram Temple : पक्ष धोरण धुडकावत काँग्रेसच्या बड्या नेत्याने गाठली अयोध्या

Congress Leaders In Ayodhya : हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांची रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेरी...
Sonia Gandhi
Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress Vs BJP : अयोध्येत सुमारे पाचशे वर्षांनंतर राम मंदिराची निर्मिती होत आहे. मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सोमवारी लोकार्पण सोहळा पार पडला. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीने देशभरातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र हा भाजप, आरएसएसचा कार्यक्रम असल्याची टीका करून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसह इतर विरोधक नेत्यांनी सोहळ्याला जाणे टाळले. पक्षाच्या हायकमांडने भूमिका घेतल्यानंतरही काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने थेट अयोध्या गाठली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह सोमवारी अयोध्येत दाखल झाले. त्यांनी रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला हजेरी लावली. काँग्रेस हायकमांडने घेतलेल्या निर्णयाविरोधात विक्रमादित्य यांनी पाऊल उचलल्याने चर्चांना उधाण आले आहे. विक्रमादित्य हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांचे पुत्र असल्याने पक्षांतर्गत त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sonia Gandhi
Ayodhya Mosque : मोठी बातमी! राम मंदिरानंतर अयोध्येत आता मशिदीचाही मुहूर्त

यापूर्वी हिमाचलमधील काँग्रेसचे (Congress) आमदार सुधीर शर्मा यांनी निमंत्रण स्वीकारून सोहळ्याला जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शर्माही अयोध्येत पोहोचले होते. अयोध्येला जाण्यासाठी विक्रमादित्य सिंह रविवारी चंदीगडहून लखनौला पोहोचले होते. तेथे त्यांनी आपले राज्याचे समकक्ष जितिन प्रसाद यांचीही भेट घेतली. त्यानंतर सोमवारी झालेल्या राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला हजेरी लावली.

Sonia Gandhi
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कारसेवेबाबत राऊतांनी केली चिरफाड; म्हणाले...

अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर सोनिया गांधींना (Sonia Gandhi) आपली भूमिका बदलावी लागली. अयोध्येत राम दर्शनासाठी शक्य होईल त्यावेळी जाणार आहे. मात्र 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. पक्षाच्या हायकमांडने घेतलेल्या भूमिकेला छेद देत सिंह अयोध्येतील कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने काँग्रेसमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हिमाचलमध्ये 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सख्खूंनी राम मंदिराचा अभिषेक केला. तसेच सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली. सख्खू यांनी रविवारी शिमल्याच्या राम मंदिरात जाऊन पूजा केली.

ते म्हणाले, 'भगवान राम हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. ते आदर्श आणि देशाची संस्कृती आहेत. मी माझ्या घरात दिवे लावणार आहे आणि इतरांनीही तसे करावे. लवकरच मी अयोध्येला भेट देईन,'' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Sonia Gandhi
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे नाशिकला; मुख्यमंत्री शिंदेंनी साधला मोठा डाव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com