Mumbai News : राजगुरुनगरमध्ये हॉटेलमधील एका वेटरने आठ आणि नऊ वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली. यानंतर या दोघींचेही मृतदेह दोन दिवस पाण्याच्या बॅरलमध्ये लपवून ठेवल्याचा प्रकार केला. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली.
यातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पीडितांच्या आईला रोख स्वरुपाची मदत करताना प्रदर्शन केले. यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड चांगल्याच भडकल्या आहेत.
काँग्रेसच्या (Congress) खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, "राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि तुमचं सरकार त्यांना थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. तुमचं नाकर्तेपण लपवण्यासाठी तुम्ही अशा ऑन-कॅमेरा दिखाव्याचा खेळ करत आहात. पण तुमच्या कृतीतून स्पष्ट होतंय की, तुमचं सरकार आमच्या मुलींच्या संरक्षणासाठी कोणतेही ठोस पावलं उचलत नाही".
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या (Shivajirao Adhalrao Patil) या कृतीला फटकारताना वर्षा गायकवाड यांनी ज्या महिलेच्या पोटची दोन लेकरं अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या झाली, त्या महिलेच्या वेदना समजून घेण्याऐवजी तुम्ही तिच्या दु:खाची किंमत ठरवली– पाच लाख रुपये! तिच्या डोळ्यांत अश्रू आहेत, मान खाली आहे, पण तुमचा कॅमेरा मात्र बंद होत नाही. हे अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असा घणाघात केला.
तुमचं सरकार पैशांच्या जोरावर सत्तेवर आलंय, त्यामुळे तुम्हाला वाटतंय की, पैसे देऊन सगळं खरेदी करता येईल. पण या आईच्या वेदनांना, तिच्या गमावलेल्या मुलांना पैसे न्याय देऊ शकत नाहीत, या मोठ्या दुःखाकडे देखील वर्षा गायकवाड यांनी आढळराव पाटलांचे लक्ष वेधले.
राजगुरूनगर या घटनेप्रकरणी हॉटेलमधील वेटर अजय दास (54, रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली आहे. अजय दास याला न्यायालयाने एक जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या हत्यातील आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.