Dr. Ashish Deshmukh Sarkarnama
पुणे

Congress News: ...म्हणून आशिष देशमुख यांनी स्वतः काँग्रेस पक्षातून बाहेर पडावं!

Ashish Deshmukh : नाना पटोलेंचा राजीनामा मागणं म्हणजे केवळ चमकोगिरी

सरकारनामा ब्यूरो

Congress News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते व माजी आमदार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे पदवीधर निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच पटोले आणि देशमुख यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आता आशिष देशमुख यांच्यावर प्रदेश युवक काँग्रेसनं टीका केली आहे.

प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी या संदर्भात निवेदन जारी केले आहे. या निवेदनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे कर्तृत्व मोठे असून, त्यांच्या कार्याचा ठसा देशभर उमटला आहे. आतापर्यंत त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्याला अधिक महत्त्व दिले आहे. जनतेचे हित आणि जनतेचा विकास हा त्यांनी घेतलेला ध्यास आहे. ते पदासाठी राजकारणात नाहीत तर जनतेच्या विकासासाठी राजकारणात आहेत याचं भान देशमुख यांनी ठेवावं असं म्हटलं आहे.

कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद झेपत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करावे असे डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना सांगितले आहे तसे पत्रही त्यांनी दिले आहे. यावरुन नाना पटोले आणि आशिष देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे.

तसेच नाना पटोलेंचा राजीनामा मागणं म्हणजे केवळ चमकोगिरी आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा माजी आमदार आशिष देशमुख यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडावं अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

गतवर्षी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. आज पुन्हा आम्ही त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहोत असे प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस सुरवसे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT