Pimpri Congress Latest News
Pimpri Congress Latest News Sarkarnama
पुणे

कॉंग्रेसाध्यक्ष निवडणूक : पिंपरीचे शंभर टक्के मतदान..एका मतदाराने केलं आसामध्ये मतदान

उत्तम कुटे

पिंपरी : देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज (ता.१७ऑक्टोबर) देशभर मतदान झाले. देशातील नऊ हजार मतदारांपैकी महाराष्ट्रातील ५६१ पैकी ५४२ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी पिंपरी-चिंचवडकर चारही मतदारांनी मतदान केल्याने उद्योगनगरीचे या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले. (Pimpri Congress Latest News)

महाराष्ट्राचे कॉंग्रेसचे प्रभारी राहिलेले मल्लिकार्जून खर्गे आणि खासदार शशी थरूर यांच्यात ही थेट लढत आहे. मात्र, गांधी घराण्याशी जवळीक अधिक असल्याने खर्गे यांचे पारडे जड वाटते आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकीप्रमाणे यावेळचीही निवडणूक सुद्धा एकतर्फी होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली आहे. २४ वर्षानंतर ही निवडणूक तथा मतदान झाले. यापूर्वी १९८८ मध्ये झालेल्या या निवडणुकीत पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचा एकतर्फी विजय झाला होता. त्यांना सात हजार ४४८, तर प्रतिस्पर्धी जितेंद्र पसाद यांना अवघी ९४ मते पडली होती. यावेळी, मात्र गांधी घराण्याबाहेर अध्य़क्ष कॉंग्रेसला मिळणार आहे. कारण गांधी घराण्यातला उमेदवारच रिंगणात नाही.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे मतदार म्हणून या निवडणुकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष मतदार नाहीत. तर, राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील सदस्य तथा पदाधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलखचे पृथ्वीराज साठे हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव, तर पिंपळे निलखचेच पक्षाचे माजी शहराध्यक्ष राहिलेले दुसरे साठे (सचिन) हे प्रदेशवर दुसऱ्यांदा सचिवपदी आहेत.

तसेच पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे बंधू पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा अध्यक्ष सद्गुरु कदम तसेच पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम आगरवाल हे प्रदेश सदस्य आहेत. पृथ्वीराज हे पक्षाचे आसाम प्रभारी असून राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीसाठी सध्या आसाममध्ये आहेत. तर, दुसरे साठे (सचिन) आणि इतर दोन प्रांतिक सदस्यांनी (आगरवाल व कदम) यांनी मुंबईला जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT