एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंच्या अडचणी वाढणार?

Eknath Khadse : जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन आहेत.
Eknath Khadse & Mandakini Khadse Latest News
Eknath Khadse & Mandakini Khadse Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात लोणी व दूध भुकटीत सव्वाकोटीचा अपहार झाल्याचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे याप्रकरणी पोलीसांनीच फिर्याद दाखल करून घेत गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या संघाच्या चेअरमन आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Eknath Khadse & Mandakini Khadse Latest News)

Eknath Khadse & Mandakini Khadse Latest News
Andheri by elaction : कुत्र्यांचा व्हिडिओ शेअर करीत सावंतांचा भाजपवर हल्लाबोल...

भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघात अपहार झाल्याची तक्रार दिली होती, त्यात त्यांनी म्हटले होते की, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा, कार्यकारी संचालक तसेच काही कर्मचाऱ्यांनी सव्वा कोटी रूपयाचे १४ टन लोणी व ९ टन दूध पावडरचा अपहार झाल्याची लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचा जबाब घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी अपहार झाल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनीच नंतर हा अपहार नसून चोरी झाल्याची तक्रार करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

Eknath Khadse & Mandakini Khadse Latest News
राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र म्हणजे मॅच फिक्स होती...

या प्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीसांना तपास केला असता जिल्हा कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी ज्या कर्मचाऱ्यांना निलंबीत केले होते. त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केले होते. हाच मुद्दा लक्षात घेवून पोलीसांना दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन आहेत. या ठिकाणी सर्व पक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com