Avinash Bagwe, Ramesh Bagwe sarkarnama
पुणे

Pune News : अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर ? ; 'हे' आहे बागवे पिता-पुत्रांच्या नाराजीचे खरे कारण !

Congress Pune News : रशीद शेख यांचा मुस्लिम समाजात चांगला प्रभाव आहे. त्याचा फटका रमेश बागवे यांना 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला.

उमेश घोंगडे : सरकारनामाब्यूरो

Congress Pune News : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात रविवारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नगरसेवक रशीद शेख यांनी भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रशीद शेख, सुधीर जानजोत आणि सदानंद शेट्टी हे काँग्रेसचे तीन माजी नगरसेवक भाजपात दाखल झाले होते. यापैकी शेट्टी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीत दाखल झाले. जानजोत अद्याप भाजपातच आहेत.

रशीद शेख यांचा मुस्लिम समाजात चांगला प्रभाव आहे. त्याचा फटका रमेश बागवे यांना 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत बागवे यांचा सुमारे साडेपाच हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे शेख यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यास बागवे यांचा विरोध होता. त्यामुळे बागवे यांना आधी कसलीच कल्पना न देता आज थेट काँग्रेस भवनात पटोले यांच्या उपस्थितीत शेख यांना प्रवेश देण्यात आला.

ज्या रशीद शेख यांच्यामुळे 2019 च्या निवडणुकीत बागवे यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला त्यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका बागवे यांनी घेतली. मात्र ऐनवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि प्रवेश घेण्यात आला. बागवे हे केली सुमारे पाच वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते.

बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हेदेखील तीन टर्म काँग्रेसचे नगरसेवक आहेत. शेख यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या बागवे पिता-पुत्रांची नाराजी समजतात भाजपकडून अविनाश बागवे यांना तातडीने आज संपर्क करण्यात आला.

दुसरीकडे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री नाना पटोले तसेच अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम होता. या ठिकाणीदेखील रमेश बागवे यांना बोलवण्यात आले. मात्र, त्यांनी तेथे जाण्याचे टाळले. त्यांना फोन करून बोलवण्यात आले. मात्र बागवे यांनी प्रतिसाद दिला नाही.

या साऱ्या पार्श्वभूमीवर अविनाश बागवे भाजपची वाट धरतात की केवळ आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी काही भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. मात्र, आज निवडणुकीचा अर्ज भरायचा असे पक्षाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसमधले नाराजीनाट्य कोणते वळण घेते हे दोन दिवसात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT