MNS News : मनसेनं करुन दिली शरद पवारांच्या 'त्या' जुन्या Videoची आठवण..

Sharad Pawar Viral Video MNS News : शरद पवारांची ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यानांच मान्य नाही का?
Sharad Pawar Viral Video MNS News
Sharad Pawar Viral Video MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Viral Video MNS News : कसबा, चिंचवड मतदार संघात पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. भाजपने कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगतार यांना उमेदवारी दिली आहे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहित हीच मागणी केली आहे.

ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे खासदार संजय राऊत , अजित पवार यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राम्हण समाज नाराज आहे. दोन्ही ठिकाणी निवडणूक होणार हे आता स्पष्ट झाले आहे. आघाडीकडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.

Sharad Pawar Viral Video MNS News
Narendra Chapalgaonkar : संमेलनाध्यक्ष चपळगावकरांना पोलिसांना अडवलं ; "आम्ही मारेकरी दिसतो का..?

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकरता त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. "महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत येत्या एक-दीड वर्षांतच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे एक दीड वर्षासाठी निवडणूक घेण्यापेक्षा या जागेवर बिनविरोध उमेदवार निवडून यावा," अशी मागणी शरद पवारांनी त्यावेळी केली होती. याची आठवण आज मनसेने पवारांना करुन दिली आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटरवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. शरद पवारांच्या या व्हिडीओवरूनच मनसेने महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची आठवण करुन दिली आहे. हा व्हीडिओ प्रदर्शित करून शरद पवारांची ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यानांच मान्य नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे

"अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाने जसा उमदेपणा दाखवला तसाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com