Milind Ekbote addressing media in Pune, accusing Sadabhau Khot of defaming the cow protection movement while linking Ajit Pawar to kattal jihad politics. Sarkarnama
पुणे

Milind Ekbote : "खोटारडा माणूस, शेतकऱ्यांचे पैसे बुडवले म्हणून अटक झालेली..."; गोरक्षकांना इशारा देणाऱ्या सदाभाऊ खोतांची मिलिंद एकबोटेंनी हिस्ट्री काढली

Cow Protection Politics : "सदाभाऊ खोत यांनी पूर्णपणे ड्रामा केला. ज्या म्हशीसाठी ते आले होते, त्या शेतकऱ्यांची नावे सलमान ताहीर, अब्दुल गफार अशी आहेत. सदाभाऊ खोत हे कसायांसाठी आले होते. गोरक्षकांची चळवळ बदनाम करण्याचे काम हे कसायांकडून सुपारी घेऊन चालू आहे."

Sudesh Mitkar

Pune News, 26 Aug : मागील काही दिवसांपासून गोरक्षकांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. गोरक्षकांकडून होणाऱ्या त्रासावर उपायोजना करण्यात यावी यासाठी काही दिवसांपूर्वी कसाई समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.

त्यानंतर अजित पवारांनी प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू असून यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत. शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय. सरकारने याबाबत लक्ष घालून कारवाई करावी.

यावर कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता गोरक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषद घेत सदाभाऊ खोत आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये एकबोटे म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी पूर्णपणे ड्रामा केला.

ज्या म्हशीसाठी ते आले होते, त्या शेतकऱ्यांची नावे सलमान ताहीर, अब्दुल गफार अशी आहेत. सदाभाऊ खोत हे कसायांसाठी आले होते. गोरक्षकांची चळवळ बदनाम करण्याचे काम हे कसायांकडून सुपारी घेऊन चालू आहे. सगळ्या कसायांची ईडी चौकशी करा. त्यामुळे आपल्या देशाच्या संपत्तीत वाढ होईल अशी मागणी देखील त्यांनी केली.

कसाई लोक पुढाऱ्यांना पैसे देतात आणि त्याआधारे पुढारी गोरक्षकांना बदनाम करण्याचे काम करतात. फलटणमध्ये वन खात्याच्या जमिनीत 40 गाई कापण्यात आल्या आहेत. कसाई लोक ही जनावरांची हाड इस्लामची संपत्ती मानतात. जनावरांच्या हाडाचे पैसे अतिरेक्यांना देतात. एक कोटी 83 लाख गाय आणि बैल हे 1983 साली होते. फक्त 83 लाख गाई शिल्लक आहेत. जवळवळ 40 ते 50 लाख गाई कापल्या गेल्या आहेत. 19 कोटी देशी गोवंश कापले गेले आहेत.

भारतात देशी गोवंश नाही त्याचे शेण नाही, रासायनिक खत वापरून अन्न केमिकलयुक्त झालं आहे. यामुळे कॅन्सर सारखे प्रमाण वाढलं आहे. हे सगळं गोमातेच्या कत्तलीमुळे झालं आहे. हा कत्तल जिहाद आहे. भारतातील देशी गाई संपवायच्या, हिंदू लोकांची मानसिकता खच्ची करायची, हिंदूंचे आरोग्य खच्ची करायचं काम केले जात आहे.

या कत्तल जिहादचे समर्थन अजितदादा करतात याची आम्हाला लाज वाटते. सदाभाऊ खोत, राजू शेट्टी रघुनाथ पाटील हे चिंधिचोर आहेत. त्यांना राजकारणातून खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. द्वारकाधीश गो शाळेत जाऊन सदाभाऊ खोतांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊ खोत हा खोटारडा माणूस आहे.

शेतकऱ्यांचे पैसे सदाभाऊ खोतने बुडवले आहे. या प्रकरणी खोतांना अटक झाली आहे. गोशाळा अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. गोशाळांवर गोसेवा आयोगाचे नियंत्रण आहे. गोशाळेत हेराफेरी होत नाही. गोरक्षण ही शासनाची पॉलिसी पाहिजे. एकही गाय किंवा बैल कापला नाही पाहिजे. दुधात भेसळ सुरू आहे.

भारतात 70 कोटी दुधाची गरज आहे. भारतात फक्त 14 कोटी दूध तयार होतं. गोरक्षणाचा कायदा कडक केला पाहिजे. मोक्कासारखे कलम केले पाहिजेत. सदाभाऊ खोत चोर आहेत. लबाड आहेत. गोरक्षक हे प्रामाणिक असून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. गोशाळांमधून अनेक जनावर शेतकऱ्यांना दिली आहेत, मात्र, सदाभाऊ खोत हे कसायांचे एजंट आहेत, अशा हल्लाबोल एकबोटे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT