Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिला डाव टाकला; जरांगेंसाठी ओएसडी राजेंद्र साबळे यांच्याकडे पाठवला निरोप

Devendra Fadnavis’ Strategic Move Amid Maratha Protest : मराठा आंदोलकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांचा मार्ग कोणता असेल, याची माहिती घेण्यासाठी आलो आहे, अशी माहिती ओएसडी राजेंद्र साबळे यांनी दिली.
Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis News
Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत असून राज्य सरकार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

  2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांना जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवले असून त्यांनी आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली.

  3. जरांगे यांनी मात्र आपली भूमिका ठाम ठेवत आंदोलन ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट केले.

Maratha Reservation Demand and Political Response : मराठा आरक्षणासाठी मंगळवारी मुंबईच्या दिशेने कुच करण्यासाठी सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे मन वळविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला डाव टाकला असून थेट स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांना जरांगेच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पाठविले आहे.

राजेंद्र साबळे हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीबाबत बोलताना साबळे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, याआधीही त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांचा मार्ग कसा असणार आहे, त्यांना येण्यासाठी कोणतीही अडचण होणार नाही, हे जाणून घेण्यासाठी आलो आहे.

विनंती हीच केली आहे की, गणेशोत्सव आहे. त्याअनुषंगाने आंदोलन पुढे ढकलू शकता का, याबाबत विनंती करणार आहे. तसेच मराठा आंदोलकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांचा मार्ग कोणता असेल, याची माहिती घेण्यासाठी आलो आहे. मार्ग कसा असेल, त्याबाबत उपाययोजना सुरू आहे, असेही साबळे यांनी स्पष्ट केले.  

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis News
Alandi Metro Extension : माऊलींच्या भक्तांसाठी खुशखबर! पुण्याची मेट्रो आळंदीपर्यंत आणण्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन

दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. आतापर्यंत खूप चर्चा झाली. आरक्षण नाही तर आंदोलनही मागे नाही, असे त्यांनी सांगितले आहे. बुधवारी मुंबईच्या दिशेने जाण्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आंदोलनाची तारीख बदलणार नाही. आता आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठ्यांनी साथ द्यावी. मी तर मुंबईला जाणार आहे. तुम्हीही मुंबईत पोहचा, असे जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ओएसडींना पाठविले आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सगळ्यांसमोरच ही चर्चा होईल, असेही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis News
Manoj Jarange Patil Agitation: छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून मुंबईत जरांगेच्या आंदोलकांसाठी "एक भाकरी समाजासाठी" उपक्रम!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: मनोज जरांगे पाटील कशासाठी आंदोलन करणार आहेत?
A: ते मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे मोर्चा घेऊन जाणार आहेत.

Q2: राज्य सरकारने कोणाला जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवले?
A: मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांना पाठवले.

Q3: सरकारने आंदोलनाबाबत काय विनंती केली?
A: गणेशोत्सवामुळे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली.

Q4: जरांगे यांनी आंदोलनाबाबत काय भूमिका घेतली?
A: त्यांनी स्पष्ट केले की आंदोलन मागे घेणार नाही आणि ठरल्याप्रमाणे मुंबईकडे जाणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com