Police Sarkarnama
पुणे

PCMC News : सहाय्यक पोलीस आयुक्तावर साडेबारा लाखांच्या खंडणीचा गुन्हा

Satara Police : विभागीय चौकशीत कसूर केल्याचा ठपका

सरकारनामा ब्युरो

Extortion Crime : पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यावर साडेबारा लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

सध्या पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad Police) आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असणारे पद्माकर घनवट (Padmakar Ghanvat) यापूर्वी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक होते. तेथील राजेंद्र चोरगे या बांधकाम व्यावसायिकाने घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्याविरोधात साडेबारा लाख रुपये घेतल्याची तक्रार केली होती. त्यानुसार घनवट आणि शिर्के यांच्याविरोधा सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहितीनुसार, तक्रारदार चोरगे यांची सातारा शहरात शैक्षणिक संस्था आहे. ते १४ वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहतात. दरम्यान, संस्थेच्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना तत्कालीन सातारा 'एलसीबी'चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि शिर्के संस्थेत येऊन नाहक त्रास देत होत.

पोलीस ठाण्यातील चौकशी दरम्यान त्रास देऊन 'ब्लॅकमेल' करत होते. पत्नी व संस्थेतील महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवत होते. तसलेच घनवट आणि शिर्के यांनी २५ लाख रुपये खंडणी मागून १२ लाख ३० हजार रुपये घेतल्याचाही आरोप चोरगे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घनवट आणि शिर्के यांची चारवेळा प्राथमिक व विभागीय चौकशी केली आहे. या चौकशी अहवालात दोघांनी कसुरी केल्याचे स्पष्ट नमूद केले. त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधिकारी पद्माकर घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर कोर्टाने दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT