PMRDA
PMRDA sarkarnama
पुणे

तुकडेबंदी धाब्यावर बसवणाऱ्या मावळ-हवेलीतील सहा बड्या प्लॉट विकसकांवर गुन्हे दाखल

सरकारनामा ब्यूरो

पुणे : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सहा प्लॉट विकसकांच्या विरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (Pune Metropolitan regional devlopment Authority) गुन्हा दाखल केला आहे. या सहा विकासकांनी मावळ व हवेली तालुक्यात मोठ्याप्रमाणात जमीनी घेऊन तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करीत प्लॉट पाडून विक्री सुरू केली होती.

तिरूपती ग्रूप (स्वामी समर्थ डेव्हालपर्स) मोजे सोमाटणे ता. मावळ, तिरूपती ग्रूप (तिरूपती स्पर्श डेव्हालपर्स) मोजे, सोमाटणे ता. मावळ, तिरूपती ग्रूप (साई गणेश डेव्हापर्स) मौजे शिरगाव ता. मावळ, तिरूपती ग्रूप (गोल्हडन तिरूपती डेव्हलपर्स) मोजे, शिरगाव ता. मावळ, नमो पार्क, मौजे उरूळी कांचन ता. हवेली, व रोव्हा व्ह्यू पार्क, मांजरी बुद्रुक, ता. हवेली या सहा प्लॉट विकसकांचा याता समावेश आहे.

नियमबाह्यपणे केलेल्या या प्लॉटची विक्री झाली तर विकत घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. शिवाय भविष्यात प्लॉट विकत घेतलेल्या या ग्राहकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळेत ही कारवाई होणे अपेक्षित होते,असे ‘पीएमआरडीए’च्या आधिकाऱ्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

संतोष प्रभाकर तरस, राजू गोरखनाथ माळी, राकेश शहाजी मुऱ्हे, इराण्णा रायचूरकर, कुणाल सुभाष अगरवाल, हरिदास धनराज भन्साळी, गुलाब भागुजी चौधरी व राहूल गुलाब चौधरी अशी गुन्हे दाखल झालेल्या विकसकांची नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT