कोणाला मतदान करावे, यासाठी मला अर्धा मिनिट लागला : संभाजीराजे पडले बुचकळ्यात

'कोल्हापूर (Kolhapur) उत्तर' विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.
Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji Rajesarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कोणाला मतदान करावे, हा विचार करण्यासाठी तीस सेकंद लागली. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज टाकली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

खासदार संभाजीराजे यांनी न्यू पॅलेस परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मतदान करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. सर्वांनी मतदान करावे, मतदानाच हक्क बजावला पाहिजे. आज बराच विचार करुन मी मतदान केले, असेही ते म्हणाले. मतदान कोणाला करावे यासाठी मला 30 सेकंद लागली. मात्र, मतदान करण्यात आनंद वाटला. व्यक्ति स्वातंत्र्य आहे. किती माणूस मोठा असला तरीही विचारपूर्वक मतदान केले जाते. तसा मीही विचार केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhaji Raje
सोमय्या पिता-पुत्रांचा पाय खोलात! कधीही होऊ शकते अटक

दरम्यान, 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव (Jayshree Jadhav) रिंगणात आहेत, तर भाजपकडून (BJP) सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणूक असली तरीही दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कसबा-बावडा इथल्या मतदान केंद्रावर थांबून मतदारांचे स्वागत केले. त्यावेळी कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील मतदानासाठी आले. तेव्हा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व ऋतुराज पाटील यांनी मतदान केंद्रावरच एकमेकांची गळाभेट घेतली.

Chhatrapati Sambhaji Raje
मी घरी येणार होतो म्हणत चंद्रकांतदादांनी दिली ऋतुराज पाटलांना 'जादू की झप्पी'

कसबा बावडा हा भाग कोल्हापूर उत्तरसाठी अत्यंत निर्णायक मानला जातो. त्यामुळे कसबा बावडा मतदान केंद्रावरच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तळ ठोकून आहेत. या ठिकाणी मतदारांना हलगी व कैताळ वाजवतच मतदान केंद्रावर आणण्यात आले. त्यामुळे कसबा बावडा मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे. मतदारांच्या लांबपर्यंत रांगा पाह्यला मिळाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com