Maharashtra Politics  Sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : सत्ताधारी-विरोधकांमध्ये 'मदारी'वरून नवा 'खेळ' सुरू; फडणवीस-राऊतांमध्ये 'डमरू' वाजण्यास सुरुवात

Sanjay Raut News : फडणवीसांनी राऊतांची लायकी काढली...

Mangesh Mahale

Pune : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 'मदारी'वरून नवा 'खेळ' सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करताना त्यांचा उल्लेख 'मदारी' असा केला आहे. यावरून आता ठाकरे गट आणि भाजप, शिंदे गटातील नेत्यांमध्ये 'डमरू' वाजण्यास सुरुवात झाली आहे.

फडणवीसांना 'मदारी' म्हणणाऱ्या राऊतांना फडणवीस आणि शिंदे गटातील नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही, कारण ते त्या लायकीचे नाहीत, लायकीचे नाही म्हणजे ते काहीही बोलतात, ते काहीही बोलत असतील तर त्याला काय उत्तर देऊ," अशा शब्दांत फडणवीसांनी राऊतांची लायकी काढली आहे.

ठाकरेंनी रामराज्यांची संकल्पना सोडली...

"ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते याचा मला आनंद वाटतो. पण दुर्दैवाने त्यांच्या संघटनेने रामराज्याची संकल्पना यापूर्वीच सोडली आहे," असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंची खिल्ली उडवली.

राऊत म्हणजे खराब झालेली कॅसेट...

फडणवीसांवरील टीकेवरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे. "संजय राऊत म्हणजे खराब झालेली कॅसेट आहे. तिला मी महत्त्व देत नाही," असे गुलाबराव जळगावात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांनी यावर बोलणे टाळले.

फडणवीसांना काय म्हणाले होते राऊत?

आज (शनिवारी) राऊतांनी आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. या नेत्यांच्या दिल्लीवारीवरून राऊतांनी खोचक टीका केली. "एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातात काहीही नाही. फडणवीस हे मदारी असून, ते डमरू वाजवतात तसे हे दोन माकडे नाचतात. त्यामुळेच त्यांना वारंवार दिल्लीला जावे लागते," अशा शब्दांत राऊतांनी त्यांना डिवचलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT