Tanisha Bhise death case Sarkarnama
पुणे

Deenanath Hospital Case: तपासाची चक्रे फिरली! गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांचे मोठे पाऊल

Tanisha Bhise Death Case Deenanath Hospital Pune: रुग्णालयाने मयत तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांकडून अनामत रक्कम ठेवण्याची मागणी केली होती का? असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहिले आहे.

Mangesh Mahale

Pune, 07 April 2025 : पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट येत आहे. गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले आहेत. तपासात पोलिस आता सक्रिय झाले आहेत.

दीनानाथ रुग्णालय घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर करा, असे पत्र पुणे पोलिस आयुक्त ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिणार आहेत.थेट रुग्णालयावर कारवाई करता येत नसल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहिले आहे.

Sarkarnama

तनिषा भिसे या साडेपाच तास दीनानाथ रुग्णालयात होत्या. पण त्यांच्यावर उपचार करण्यात आले नसल्याचे प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. रुग्णालयाने मयत तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांकडून अनामत रक्कम ठेवण्याची मागणी केली होती का? असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समितीच आता वादाच्या भोवऱ्यात आली आहे. पुण्यातील मनसे चे राम बोरकर यांचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या वैद्यकीय समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांवर मनसेने आक्षेप घेतला आहे.

चौकशी समितीचे डॉ. राधाकृष्ण पवार यांच्यावर आक्षेप घेत बोरकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.चौकशी समितीचे अध्यक्षपदावरून राधाकृष्ण पवार यांना हटवण्याची मागणी बोरकर यांनी केली आहे.डॉ. पवार यांच्या शासकीय कामकाजातील अनियमितता व गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी आहेत.

त्याच्या विरोधात विधानसभेत आरोप करण्यात आले आहेत, असे बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहेत. या विषयावर लक्षवेधी घेऊन चर्चा करण्यात आली मात्र त्यावर गांभीर्याने कारवाई झाली नाही, असे असताना वादग्रस्त अधिकाऱ्याकडे गंभीर प्रकरणाची चौकशी संपूर्ण कितपत योग्य आहे,असा सवाल बोरकर यांचा उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT