Deenanath Mangeshkar Hospital Sarkarnama
पुणे

Deenanath Hospital Case : मोठी बातमी! तनिषाच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार, 10 लाख मागितले अन् पाच तास थांबवले

Deenanath Hospital Case Tanisha Bhise Death Case : सकाळी नऊ वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या तनिषा रक्तस्त्राव होत असताना देखील तब्बल पाच तास थांबवून घेतले पण उपचार केला नाही, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

Roshan More

Deenanath Hospital Pune News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्याला रुग्णालयच जबाबदार असल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे.

सकाळी नऊ वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या तनिषाला रक्तस्त्राव होत असताना देखील तब्बल पाच तास थांबवून घेतले पण उपचार केला नाही. तसेच रुग्णालयाकडून डिपाॅझिट म्हणून 10 लाखांची मागणी केली असल्याचे देखील अहवालातून उघड झाले आहे. याबाबात माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, अहवालामध्ये रुग्ण हा सकाळी 9 वाजून 1 मिनिटाने रुग्णालयात दाखल झाला. तिच्या ऑपरेशनची देखील तयारी करण्यात आली होती. मात्र, रुग्णाला 10 लाखांचे डिपाॅझिट भरण्यासा सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकाईकांनी काही रक्कम भरण्याची तयारी दाखवली होती. मात्र, रुग्णावर उपचार करण्यात आले नाहीत.

रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना रुग्णालयाकडून कुठलेही उपचार करण्यात आले नाहीत. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनाच तुमच्याकडे कुठलेही औषध असेल तर ते रक्तस्त्राव थांबण्यासाठी द्या असे सांगण्यात आले, अशी माहिती देखील रुपाली चाकणकर यांनी दिली.

गर्भवती तनिषाच्या मृत्यूला दिनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे. उपचार मिळाले असते तर तनिषा वाचू शकली असती. दोषींना पाठीशी घातले जाणार नाही त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल, असे देखील चाकणकर यांनी ठणकावले.

रुग्णाच्या गोष्टी सार्वजनिक केल्या

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा हिच्या आजाराबाबतच्या गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या. ते जे चौकशी समितीसमोर सांगू शकले असते ते त्यांनी सोशल मीडियातून सार्वजनिक केले. पैशाची मागणी रुग्णाच्या समोर करण्यात आल्याने रुग्ण खचला. रुग्णाला सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा रुग्णालयाकडून चांगला प्रतिसाद देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT