Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाख डिपाॅझिट न भरल्याने उपचार नकारल्याचा आरोप होत आहे. तनिषा यांचा मृत्यू झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात राजकीय, सामजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. रुग्णालयाने उपचार नाकारले का? याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने समिती तयार केली होती. या समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे.
आज (सोमवारी) राज्य महिला आयोगाची बैठक पुण्यात होत आहे. या बैठकीत चौकशी समितीचा अहवाल मांडण्यात येणार आहे. साम टिव्हीच्या वृत्तानुसार अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.
पेशंटला अॅडमिट करून न घेणे ही सर्वात मोठी चूक आहे, असा ठपका या अहवालात ठेवला आहे. नर्सिंग होम अॅक्टमधील नियमानुसार डिपॉझिट रक्कम मागता येत नाही.
दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून नेमलेल्या समितीने तीन प्रमुख निष्कर्ष काढण्यात आले त्यामध्ये अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार करण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही मानले नाहीत, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.
राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल आज समोर येणार असतानाच पोलिसांनी देखील मोठे पाऊल उचललेल आहे. दीनानाथ रुग्णालय घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर करा, असे पत्र पुणे पोलिस आयुक्त ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सरकराच्या चौकशी समितीवर आक्षेप घेतला आहे. संजय मोरे म्हणाले, समितीमधील डॉ.राधाकृष्ण पवार यांच्याविरोधात गैरव्यवहाराच्या तक्रारी आहेत. परंतु आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन प्रकरण दडपले आहे. त्या व्यक्तीला चौकशी समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने निष्पक्ष चौकशीबाबत शंका उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.