NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाल्याने राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्हावरच दावा केला. त्यामुळे राष्ट्रवादीत जोरदार हालचाली वाढल्या आहेत.
अजित पवारांनी आपल्याबरोबरच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करत राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकी करण्याबाबत हालचालीही सुरू केल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र सुनील तटकरे यांनी त्यांना दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक मानकर यांचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे अॅक्शन मो़डवर आले आहेत. अजित पवार यांच्याकडून दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केल्यानंतर आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे काम जोरात सुरु आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आज दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.