Pune News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच 75 वा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला. त्यानंतर मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण असणारे याबाबतच्या राजकीय वर्तुळात चर्चांची खल सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिवसा आणि रात्री पंतप्रधानपदाची स्वप्न पडत असल्याची टीका केली होती. त्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान कधी होतील हे काळ ठरवेल मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आणि गुण आणि त्या पदासाठी आवश्यक असणारी इफेशनसी आहे. तसंच रात्रंदिवस काम करण्याचं व्हिजन देखील त्यांच्याकडे आहे.'
'देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे उमेदवार कधी असतील हे आमचा पक्ष ठरवेल. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पंतप्रधान पदाचे गुण आहेत. आणि फडणवीस जेव्हा पंतप्रधान होतील तेव्हा तुम्ही अभिनंदन करण्यासाठी अपॉइंटमेंट मागत बसाल', असा टोलाही सपकाळ यांना पाटील यांनी लगावला.
'हर्षवर्धन सपकाळ हे कालपर्यंत एक पडलेले आमदार होते.आता प्रदेशाध्यक्ष झालेत म्हणून त्यांनी इतकं बोलू नये. काँग्रेस हा आमच्या विरोधातला पक्ष असला तरी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि आधी काँग्रेसचे होते आणि आता आमच्याकडे आहेत असे राधाकृष्ण विखे पाटील तसेच हर्षवर्धन पाटील असे वेलकल्चर आणि खानदानी माणसं असं काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे.', असे ते म्हणाले
'हर्षवर्धन सपकाळ हे देखील त्या परंपरेतील आहेत. त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका जर आम्ही बोलायला लागलो तर मग वाईट वाटून घेऊ नका.देवेंद्र फडणवीस आम्हा सर्वांना अशा बाबतीत दाबून ठेवतात. मात्र, जर त्यांनी आम्हाला सुटा म्हणून सांगितलं तर ते तुम्हाला फार महागात पडेल.', असा इशारा देखील सपकाळ यांना त्यांनी दिला.
फडणवीसन वर जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा आमच्यासारखा लोकांचाही संयम सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं वारंवार झाल्यास आम्हालाही अंगावरती जावं लागेल, असे देखील ते म्हणाले,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.