Pankaja Munde : ओबीसी-मराठा संघर्षावर मंत्री पंकजा मुंडेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'मी जातीचा रंग पाहत नाही, राज्यकर्त्यांनी...'

Pankaja Munde On OBC Maratha Reservation : सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील विविध समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही नेत्यांकडून दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, अशी वक्तव्य देखील केली जात आहेत. त्यामुळे काही समाज आमने-सामने आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 21 Sep : राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर मराठा समाजाच्या विविध मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत त्याबाबतचा जीआर जारी केला.

हा जीआर जारी झाल्यापासून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी संबंधित जीआर मागे घेण्याची मागणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय मराठ्यांच्या मागण्या मान्य होताच ओबीसींसह, बंजारा समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहेत.

त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही नेत्यांकडून दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, अशी वक्तव्य देखील केली जात आहेत. त्यामुळे काही समाज आमने-सामने आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Pankaja Munde
Vijay Waddettiwar Politics: विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, ओबीसी महामंडळांसाठी काय दिले?

अशातच आता भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षण मागणाऱ्या समाजाची मागणी नैसर्गिक आहे, तसंच त्याला होणारा विरोधही नैसर्गिकच आहे. यातून मार्ग काढणे हे नेत्यांचे कर्तव्य असल्याचं वक्तव्य केलं आहे.

पत्रकारांनी आरक्षणा संदर्भात प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ओबीसी-मराठा संघर्ष आहे. मात्र ज्या पद्धतीने तो मांडला जात आहे तसा तो मला पाहायला मिळत नाही. कारण मी तसे चष्मे लावून फिरत नाही. मी एखाद्या माणसाकडे बघत असताना त्याच्या जातीचा रंग पाहत नाही. त्यामुळे कदाचित तसे मला दिसत नाही.' तसंच यावेळी आरक्षणाची मागणी आणि विरोध दोन्ही नैसर्गिक असल्याचं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, 'अनेक समाज आरक्षण मागत आहेत.

Pankaja Munde
Tribal Birhad Morcha: धक्कादायक; सरकारी उदासीनतेचा बळी, आदिवासी बिऱ्हाड मोर्चातील युवकाने संपवले जीवन!

तिथला समाज विरोध करतो हे नैसर्गिक आहे. जसे त्यांचे मागणे नैसर्गिक तसा विरोधही नैसर्गिक आहे. यातून मार्ग काढणे हे नेत्यांचं कर्तव्य असून राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. मात्र, तो निर्णय घेताना सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या समाजाला धक्का लागू नये, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com