Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : 'सी-व्होटर'च्या सर्व्हेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,"देशात फक्त मोदींचीच...''

Sudesh Mitkar

Pune News: महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा सर्व्हे 'सी व्होटर' संस्थेकडून करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी कुठेतरी आघाडी घेत असून महायुती पिछाडीवरती असल्याचे चित्र आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा दावा केला आहे.

पुणे येथे कार्यक्रमासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, राज्यात वाढत असलेल्या कोरोना केसेसकडे राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यामध्ये काळजी करण्यासारखी स्थिती नसली तरी काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतली असून योग्य त्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत. कोरोनाबाबत लागणारी सर्व यंत्रणा सूचना सुसज्ज असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव फार वाढणार नाही अशी अपेक्षा असल्याचं फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

31 डिसेंबर न्यू इयर सेलिब्रेशन येत आहे. कोरोनाबाबत मागील काही वर्षांमध्ये नागरिक एज्युकेट झाले आहेत. त्यांनी कोरोना प्रादुर्भावाचा त्रास काढला आहे. त्यामुळे कोरोनाबाबतचा आपला पूर्व अनुभव लक्षात घेता आणि हा कोरोनाचा प्रादुर्भाव किती वेगाने वाढतो हे लक्षात लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सरकारतर्फे करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, सी व्होटर सर्व्हे असो अथवा कोणताही सर्व्हे असो, मी सर्वांचा आदर करतो. या सर्वे मध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा तर महायुतीला कमी जागा दाखवत आहे. मात्र सध्या देशभरामध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे. आणि जनतेने मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याचं निश्चित केलं आहे. जनता फक्त मोदी यांनाच मतदान करणार असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 40 पेक्षा अधिक जागांवर आम्ही विजय मिळवून असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

(Edited By - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT