PMC News : पुणे महापालिकेची 'ही' अजब अट; लहान मुलांना बसणार फटका

Online Registration To Visit the Zoo For Free: मोफत प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी पालिकेचा ऑनलाईन नोंदणीचा हट्ट
Katraj Zoo
Katraj ZooSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सरकारी कारभारात अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटलचा अधिकधिक वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे.

मात्र पालिकेच्या पीएमसी केअर अँप तसेच वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या आठ वर्षापर्यंतच्या लहान मुलांनाच पालिकेच्या कात्रज उद्यानात मोफत प्रवेश देण्याची अट अनेक गोरगरीब कुटूंबातील तसेच आँनलाईनचा वापर न करणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. ऑनलाईन नोंदणी नसलेल्या लहान मुलांकडून नियमीत शुल्क आकारले जात असल्याने वादविवादाचे प्रकार सर्रास घडत आहेत.

पुणे महापालिकेने कात्रज येथे स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र उभारले आहे. हे देशातील महत्वाचे प्राणीसंग्रहालय असून यात सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. या प्राणीसंग्रहालयाला दररोज भेट देण्याची संख्या मोठी असून सुट्टीच्या काळात नागरिकांच्या रांगा येथे लागत असतात.

पुणे शहरासह आजुबाजुच्या भागातील नागरिक, लहान मुले तसेच शाळांच्या सहली, परदेशी नागरिक येथे येत असतात. मोठ्या व्यक्तींसाठी ४० रुपये तर लहान मुलांसाठी १० रूपये शुल्क पालिकेकडून आकारले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Katraj Zoo
Shirur Loksabha : अजितदादांनी कोल्हेंना ‘टार्गेट’ करताच शिरूरसाठी विलास लांडेंनी दंड थोपटले..!

शाळांना सध्या नाताळची सुट्टी सुरू झाल्याने अधिकाधिक लहान मुलांना राजीव गांधी प्राणी संग्रहालय पाहता यावे, यासाठी पालिकेने कात्रजच्या उद्यानात लहान मुलांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

३१ डिसेंबरपर्यंत आठ वर्षाच्या खालील आणि ४ फूट ४ इंच उंची पर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. ही लहान मुलांना पालिकेची नाताळची भेट असल्याचा गाजावाजा पालिकेकडून केला जात होता.

मात्र लहान मुलांना मोफत प्रवेश देताना त्याची आँनलाईन नोंदणी करण्याचे बंधन पालिकेने घातले आहे. यामुळे कात्रज उद्यान पहायला गेलेल्या अनेक लहान मुलांचा आणि पालकांचा हिरमोड झाला आहे. आँनलाईन नोंदणी केलेली नसल्यास संबधित मुलांना उद्यानात सोडले जात नाही. यामुळे वादाचे काही प्रकार देखील येथे घडले आहेत.

या मोफत योजनेबाबत महापालिकेचे उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांना विचारले असता, ते म्हणाले, ऑनलाईनचा वापर वाढावा, यासाठी ही अट घालण्यात आलेली आहे. ज्या मुलांची ऑनलाईन नोंदणी नाही, त्यांना नियमित दहा रूपयांचे तिकीट काढून त्यानंतरत उद्यानात प्रवेश मिळणार आहे. सर्वांकडे स्मार्ट मोबाईल असतो, मग ऑनलाईन केले तर बिघडले कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पालिकेने घातलेली अट अत्यंत जाचक असून यामुळे झोपडपट्टी राहणारी मुले प्राणीसंग्रहालय पाहण्यापासून वंचित राहत आहेत. ऑनलाईन चा हट्ट का? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने ही जाचक अट मागे घ्यावी, अशी मागणीही कदम यांनी केली आहे.

Katraj Zoo
Supriya Sule : 'जी संधी शरद पवारांना मिळाली, ती संधी दादांनाही मिळावी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com