Fadnavis and Pune Commissioner Sarkarnama
पुणे

CM Fadnavis and Pune Commissioner : मुख्यमंत्र्यांची पुणे महापालिका आयुक्तांवर नाराजी? ; 'GBS' बाबत माजी आयुक्तांना सोपवली महत्त्वाची जबाबदारी!

CM Fadnavis onPune GBS : सध्या पुणे शहरात गुलियन बेरी सिंड्रोम या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या 100 पार पोहचली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे शहरात 'जीबीएस'चा संसर्ग वाढत असताना त्यावर आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने करण्यात आलेल्या नाहीत. संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असताना देखील उपाययोजना करण्यात वेळ खाऊपणा केला गेला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापालिकेच्या कामकाजावरती नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जीबीएसच्या संसर्ग बाबतीतील कामांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी पुणे महापालिकेत आयुक्त असलेल्या आयएएस अधिकाऱ्याला महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचं दिसत आहे.

सध्या पुणे शहरात गुलियन बेरी सिंड्रोम या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या 100 पार पोहचली आहे. तर या आजारांनी बाधित झालेल्या सोलापूरच्या तरुणाला जीव देखील गमावा लागला आहे. या आजारांनी बाधित असलेल्या व्हेंटिलेटर वरील रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे.

दूषित पाणी आणि दूषित अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शहरातील सिंहगड रोड परिसरात सर्वाधिक आहे. या आजाराचे उपचार सरकारकडून मोफत देखील करण्यात आले आहेत. सर्व प्रशासकीय व्यवस्था या आजाराकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात काही रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने तातडीने पावलं उचलणं आवश्यक असताना ती उचलली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार अधिक वेगाने झाला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाच्या या गलथान कारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) नाराज असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेत(Pune Municipal Corporation) काम केलेल्या माजी महापालिका आयुक्तांना या आजाराबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुळात हा अहवाल सध्याचे आयुक्त असलेल्या राजेंद्र भोसले यांच्याकडून घेणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता दुसऱ्या आयएएस अधिकाऱ्यास या कामात लावल्याने देवेंद्र फडणवीस सध्याच्या आयुक्तांच्या कारभारावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कामगिरी सोपवल्यानंतर या माजी महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागातील तसेच इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून हे आयएएस अधिकारी माहिती घेऊन अहवाल तयार करण्याचं काम करत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT