
Anjali Damania on Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दामानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधाती पुरावे सादर केले.
या भेटीनंतर मीडियाशी बोलाताना दामानिया (Anjali Damania) म्हणाल्या, 'जवळपास 25 ते 30 मिनिटे आमची भेट झाली. त्यांचे म्हणणे होते की जे काही बीडला झालं आहे, ते माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य आहे आणि त्याचं मी कुठेही समर्थन करत नाही. त्यावर माझं म्हणणं होतं की, तुम्ही राजीनामा का घेत नाहीत? त्यांना पुरावे हवे होते, तर ते सर्व पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले होते.'
तसेच 'मी त्यांना दाखवले की, कसं धनंजय मुंडे(Dhananjay Munde), राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित बिझनेस कसे आहेत. कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय, म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहीजे. त्यासाठी मी त्यांना गृहमंत्रालयाने आमदार आणि मंत्र्यांसाठी जे निर्देश दिले होते. ते दाखवले, त्या व्यतिरिक्त कायद्यानुसार जे सांगितलं आहे की, कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वत:साठी किंवा त्याच्या घरच्यासाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. असं असतानाही 'महाजनको'कडून यांना कसा नफा मिळतोय, हे पेपर दाखवले.' असंही दमानिया म्हणाल्या.
याशिवाय 'यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले समर्थक, जे खरंतर समर्थक नाहीत तर अक्षरशा दहशतवादी आहेत. ज्यांनी इतक्या मोठ्याप्रमाणात जी बीडमध्ये दहशत केली आहे, ते सगळे फोटो, रील्स अगदी शांतपणे त्यांनी ते बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलं आहे की, उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मिटींग आहे. त्यात हे सर्व पुरावे जे आज मी त्यांना दाखवले, त्यासर्वांवर ते उद्या मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय घेतील.' असं दमानिया यांनी सांगितलं.
याचबरोबर 'मला खात्री आहे, की जनभावना आहे आणि जनतेचा आक्रोश आहे. या व्यतिरिक्त खरंच ते जे कृत्य केलं गेलं ते इतक निघृण होतं, की आता महाराष्ट्रात अशा कृत्यांना कुठेही कोणीही थारा देवू नये, म्हणून आपला लढा आहे. हे देखील मी त्यांना सांगितलं आणि त्यांचंपण असंच मत होतं की यापुढे असं कधीही घडू नये. म्हणून मी म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेणं आवश्यक आहे. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून ते सर्व कागदपत्र दाखवणार आहेत आणि त्यानंतर एकत्रित निर्णय घेवू, असं त्यांनी सांगितलं आहे. तरी आता बघूयात ते काय निर्णय घेतात.' अशी माहिती यावेळी अंजली दमानिया यांनी दिली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.