Donald Trump Receives Death Threat : जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी!

Donald Trump News : अमेरिकन पोलिसांनी अटक केल्यावर संबंधित आरोपी म्हणाला, 'मी तर...' ; जाणून घ्या, कशी झाली अटक?
Donald Trump Receives Death Threat
Donald Trump Receives Death Threatsarkarnama
Published on
Updated on

US President Donald Trump News : जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ति म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जावे मारण्याची धमकी दिली गेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, ट्रम्प यांच्याविरोधात सोशल मीडियावर धमकीची पोस्ट करण्याच्या आरोपात फ्लोरिडाच्या शॅनन एटिकिंस या व्यक्तीला अटक केली गेली आहे.

शॅनन एटिकिंसच्या फेसबुक अपडेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या शपथविधीच्या एक दिवस आधी एक पोस्ट लिहिलेली आढळली होती. ज्यात लिहिले होते की, अमेरिकेला वाचवण्यासाठी केवळ एक गोळी चालवण्याची गरज आहे. पोलिसांनी सांगितले की हीच पोस्ट एटकिंसच्या अटकेसाठी प्रमुख कारण बनली. शुक्रवारी रात्री त्याला फ्लोरिडातील पाम बीच जवळून अटक करण्यात आली. अशीही माहिती समोर आली की अटकेच्यावेळी त्याच्याजवळ कोकेनच्या तीन बॅग देखील आढळून आल्या.

Donald Trump Receives Death Threat
Yogi Adityanath : योगी कसे बनले भाजपचे 'ब्रह्मास्त्र'? ; जिथे घेतल्या सभा तिथे भाजपला झाला फायदा!

कशी झाली अटक? -

ही अटक FBIकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे झाली आहे. हे प्रकरण विशेषकरून FBI आणि सिक्रेट सर्व्हिससाठी संवेदनशील आहे. कारण, मागील वर्षीही ट्रम्प यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न झालेला आहे. परंतु सुदैवाने ते सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे FBI आणि सिक्रेट सर्व्हिस ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच हाय अलर्टवर असतात.

शॅनन एटिकिंसने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टवरून जेव्हा वातावरण तापलं, तेव्हा त्याने म्हटले की तो मजाक करत होता. परंतु वेस्ट पाम बीचचे पोलिस प्रमुख टोनी अराउजो यांनी हे मान्य करण्यास नकार दिला आणि म्हटले की, हा काही चेष्टेचा विषय नाही. आजच्या परिस्थितीत अशाप्रकारे बोलणं धोकादायक ठरू शकते.

Donald Trump Receives Death Threat
T Raja Singh News : ''नागा साधूंना जर 15 मिनिटं दिली, तर हैदराबादेत...'' ; भाजप आमदार टी.राजा यांचं मोठं विधान!

पोलिसांनी(Police) शॅनन एटिकिंसच्या अनेक अन्य सोशल मीडिया पोस्टही सादर केल्या, ज्यामधील एका पोस्टमध्ये लिहिले होते की, 'इतिहासाची पुनरावृत्ती होते, येथे वर्षानुवर्षे एकही खून झालेला नाही.' तसेच पोलिसांनी त्याची 19 जानेवारीची पोस्टही दाखवली, ज्यात लिहिले होते की 'मला X वर ब्लॉक करण्यात आलं आहे कारण मी म्हणालो होतो की मला आशा आहे आणि प्रार्थना करतो की कोणीतरी त्याला मारेल.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com