Pune News : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आळंदी शहरा जवळ कत्तलखाण्याचे आरक्षण विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे आळंदी सारख्या देवस्थानाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कत्तलखाण्याचे आरक्षण टाकण्यात आल्याने त्याबाबत सर्व स्तरातून नाराज व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केला आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. त्याबाबतच्या आरक्षण वगळण्याच्या आदेश मी दिले आहेत. वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही.
शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, मी कर्जमाफी बाबत सविस्तर मी सांगितले आहे.कधी करायचे,सरकार शब्द फिरवत नाही,योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. सगळं होईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.पावसामुळे वाढलेल्या धरण साठ्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील धरणातील पाण्याबाबत आणि पावसाच्या पाण्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत, कधी विसर्ग सोडायचा कधी कमी करायचा, याबाबत बाजूच्या राज्यांशी देखील आमचे बोलणे सुरू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जगभरातील 600 विद्यापीठांमध्ये आले आहे. पुढील काही काळामध्ये ते 500 मध्ये येईल 500 विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचे नाव आल्यास ती मोठी गोष्ट असणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार असल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यापीठाचे अभिनंदन केले की जगभरात 600 विद्यापीठांमध्ये येण्याचा मान पुणे विद्यापीठाने मिळवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.