Sunetra Pawar NCP Sarkarnama
पुणे

Devram Lande Resigns : सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, माजी जिल्हा परिषद अध्यक्षाचा राजीनामा; सून जिल्हा परिषद सदस्य

NCP Sunetra Pawar Devram Lande : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

Roshan More

NCP News : पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य देवराम लांडे यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

देवराम लांडे यांची सोशल मीडियावर दहा कोटी रुपयांची मागणी एका कंपनीकडे करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी अनेक नेत्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती.

दरम्यान, लांडे यांनी या क्लिप बनावट असल्याचा दावा केला आहे. देवराम लांडे यांची सून मोनाली अमोल लांडे या जुन्नरच्या बारव-तांबे गटातून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत.लांडे यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे की, या प्रकरणाची पोलीस चौकशी पूर्ण होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे.

गेल्या काही दिवसांपासून माझ्या संदर्भात काही वादग्रस्त व आक्षेपार्ह ऑडिओ व व्हिडिओ क्लिप्स समाजमाध्यमांवर तसेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या आहेत. सदर क्लिप्स या खोट्‌या बनवण्यात आल्या आहेत तरी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, यासाठी मी स्वतः जुन्नर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली असल्याचेही त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे.

राजकीय विरोधकांचे षडयंत्र

माझ्या बाबतीत घडवून आणण्यात आलेल्या या प्रकारामागे काही राजकीय विरोधकांचे षड्यंत्र असण्याची शक्यता असून, या माध्यमातून माझी वैयक्तिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माझी भावना आहे. तथापि, या प्रकरणाची सत्यता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे माझ्या वैयक्तिक प्रतिमेबरोबरच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची प्रतिमादेखील विनाकारण मलिन होऊ नये, तसेच पक्षाला कोणत्याही प्रकारची राजकीय अडचण किंवा गैरसोय निर्माण होऊ नये, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची पोलीस चौकशी पूर्ण होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे.

चौकशीतून सत्य समोर येईल

माझा हा निर्णय पक्षावरील नाराजी अथवा पक्षाच्या विचारधारेपासून फारकत घेण्याच्या भावनेतून नसून, केवळ स‌द्यस्थितीत पक्षाची प्रतिमा व प्रतिष्ठा जपण्याच्या उ‌द्देशाने घेतलेला आहे. चौकशीअंती सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. तरी माझा सदर राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT