Devram Lande Apologiz : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी मनसे कार्यालयात जात मागितली राज ठाकरेंची माफी, म्हणाले, 'तो' व्हिडिओ...

Raj Thackeray MNS : पुणे जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी मनसेच्या कार्यालयात जात मनसे कार्यकर्ते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची माफी मागितली.
Devram Lande amid the controversy over alleged remarks against MNS chief Raj Thackeray
Devram Lande amid the controversy over alleged remarks against MNS chief Raj Thackeraysarkarnama
Published on: 
Updated on: 

Devram Lande News : पुणे जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष देवराम लांडे आणि त्यांचे पुत्र अमोल लांडे यांचे कथित व्हिडिओ क्लिप समोर आली होती. त्यामध्ये देवरा लांडे हे राज ठाकरेंबद्दल अपशब्द बोलताना दिसत आहेत. तसेच आदिवासी सरपंच, माजी आमदार अतुल बेनके यांच्यावर देखील टीका करताना ऐकायला मिळत आहे. कंपनीला आदिवसींच्या जमीन मिळवून देण्यासाठी ते 10 कोटींची मागणी करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा देवराम लांडे यांनी केला आहे. मंगळवारी त्यांनी मनसे कार्यालयात जात थेट राज ठाकरेंची आणि मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली.

ते म्हणाले, 'मी राज ठाकरेसाहेबांचा खंदा समर्थक आहे. राजसाहेब हे माझे दैवत आहेत. मी त्यांच्या बद्दल कधीच अपशब्द वापरणार नाही. तो व्हिडिओ बनावट आहे. मात्र, तरी देखील भावना दुखावल्या असतील तर मी मनसे कार्यकर्त्यांच्या आणि राज ठाकरेसाहेबांची माफी मागतो.'

'त्या व्हिडिओबाबत मी उद्या खरे खोटं करणार आहे. याबाबत पोलिस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. राजसाहेबांबद्दल, अतुल बनके यांच्याबद्दल मी बोललेलो नाही. आदिवासी भागातील सरपंचाबद्दल बोललो नाही. जो व्हिडिओ बनवला आहे, त्यामागे षडयंत्र आहे. यामागे जुन्नर तालुक्यातील मोठी व्यक्ती असावी, असा माझा अंदाज आहे.हे प्लॅनिंग करून केलं आहे.', असा दावा देखील देवराम लांडे यांनी केला.

Devram Lande amid the controversy over alleged remarks against MNS chief Raj Thackeray
Pune ZP News : अजितदादांनी दिलेले टार्गेट पुणे जिल्हा परिषदेने गाठले; राज्यात दुसरा क्रमांक; सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

देवराम लांडे कोण?

देवराम लांडे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. पुढे राष्ट्रवादीतून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2024 ची विधानसभा निवडणूक त्यांनी अतुल बेनकेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून लढली.मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Devram Lande amid the controversy over alleged remarks against MNS chief Raj Thackeray
MNS leader death threat : अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला, मनसेच्या मावळ तालुकाध्यक्षांना थेट जीवे मारण्याची धमकी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.