Dhananjay Munde, Ajit Pawar, Gopinath Munde
Dhananjay Munde, Ajit Pawar, Gopinath Munde sarkarnama
पुणे

मुंडेसाहेबांची ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर अन् अजितदादांवर टाकली!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मागील पाच वर्षात महामंडळाचे काम झाले नाही. या महामंडळाला लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांचे नाव आहे. त्यांनी त्यांची तह्‌यात ऊसतोड मजुरांसाठी दिली. मात्र, त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांची उसतोड मजूरांसाठी महामंडळ, असावे ही इच्छा पूर्ण झाली नाही. त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली त्यांच्याकडुनही झाले नाही, अशा टोला त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना नाव न घेता लगावला. मुंडे साहेबांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजितदादांवर नियतीने दिली आहे, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे उद्घाटन दुरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. या वेळी धनंजय मुंडे बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, आमदार नरेंद्र दराडे, अतुल बेनके, संजय दौंड, सुनील टिंगरे, रोहित पवार, सुनील शेळके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख आदी उपस्थित होते.

जीवनामध्ये अनेक क्षण असे येवून जातात. माझ्या जीवनातला आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे उसतोड कामगार मंडळाला कार्यालय मिळाले. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर मी अजितदादांना विनंती केली. मला उसतोड मजूरांसाठी काहीतरी करायची आहे. गेल्या अनेक वर्षात अनेक समित्या झाल्या, मात्र काहीच झाले नाही, असेही मुंडे म्हणाले.

आजचा दिवस आपल्यासाठी स्मरणीय असल्याचे सांगून मुंडे म्हणाले, ऊसतोड कामगारांशी आपले भावनिक नाते आहे. अजित पवार यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात महामंडळाची घोषणा केली आणि टनामागे १० रुपये कारखाना आणि १० रुपये राज्य सरकार देईल, असा निर्णय घेतला. हा निर्णय कामगारांच्या कल्याणासाठी महत्वाचा ठरेल.

महामंडळ ही मुंडे साहेबांना आदरांजली आहे. ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर आधार जोडणी करून त्याच मजुरांना काम द्यावे लागणार आहे. त्यामुळे मजुरांचा त्रास वाचण्यासोबत करखान्यांचाही फायदा होणार आहे. मजुरांच्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी भविष्यात महामंडळ घेणार. चांगल्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी अशा संस्थाशी करार करण्याचाही प्रयत्न होणार आहे. महिलांच्या आरोग्याची जबाबदारी घेताना ऊसतोड कामगारांच्या विम्याची जबाबदारीही भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात येईल. तसेच भगवान गड कोणत्या मोठ्या माणसाच्या देणगीवर नाही, तर उसतोड मंजूरांच्या घामाच्या पैशावर मोठा झालेला आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT