मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय (Assembly session) अधिवेशनामध्ये हातवारे केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओ वरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीच या हातवाऱ्यांवर भाष्य केले आहे.
मुंडे म्हणाले, जे काही तुम्ही पाहिले तेच खरे होते. स्पष्टपणे हातवारे सुरु होते. विधान सभेत समोर विरोधी पक्षनेते बसले होते. बाहेर विधानभवन परिसरात तसेच काही पत्रकारांकडून आजही बॉम्ब फोडणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. म्हणून मी इशाऱ्यातून बॉम्ब फोडणार आहेत का? असे विचारत होतो. त्यांचे लक्ष नव्हते...म्हणून मी एक दोनदा विचारले. त्यानंतर ते माझ्याकडे बोट दाखवत हो म्हणाले. मला वाटले माझ्यासंबंधीत काही आहे…तर मीदेखील तयारीत आहे असे म्हटले, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
''सूडपद्धतीने कारवाई केली जात आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी वाटेल ते करायचे, कोणालाच सोडायचे नाही, सर्व केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जात असताना अजून एक बॉम्ब फोडत असल्याची माहिती होती. त्यामुळे आम्ही पण तयार आहोत अशी भूमिका होती. ते मजेने बोलले गेले. सभागृहातील खेळीमेळीच्या वातावरणात सर्व काही झाले होते.
अधिवेशनात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे वित्तीय अहवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) सादर करत होते. मात्र, जयंत पाटील यांचे मागे बसलेले धनंजय मुंडे समोर बसलेल्या कोणाला तरी बॉम्ब कुठे आहे? असे हातवारे करुन विचारताना व्हिडीओमध्ये दिसत होते. यावेळी ते बॉम्ब, हात वर करुन स्फोट असे हावभाव करुन संवाद साधत होते. नंतर ते स्वत:चे दंड थोपटून घेत असल्याची दृष्ये कॅमेरात कैद झाली होती. त्यावर मुंडे यांनी आज मैन सोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.