Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

Dilip Walse On Sharad Pawar : 'माझ्या नोकरीसाठी पवारसाहेबांनी फोन केला'; दिलीप वळसे पाटील यांनी सांगितला 'तो' किस्सा

डी. के वळसे पाटील

Pune Political News : आता राज्याच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पहिल्या नोकरीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी प्रयत्न केले होते. याबाबत खुद्द वळसे पाटलांनीच तो किस्सा सांगून आठवणींवा उजाळा दिला. निमित्त होते करीयर मेळाव्याच्या कार्यक्रमाचे.

आंबेगावातील अवसरी खुर्द येथे करियर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातील काही टप्प्यांचा उलगडा करत विद्यार्थ्यांना आयुष्याचा कानमंत्र दिला.

दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil म्हणाले, निरगुडसर येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाले. त्यानंतर अकरावीत जेमतेम मार्कांनीच उत्तीर्ण झालो. त्यावेळी वडिलांनी (माजी आमदार दिवंगत दत्तात्रय वळसे पाटील) नोकरीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे नेले. पण मी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवारांनी Sharad Pawar माझ्या नोकरीसाठी राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांना फोन केला होता. वडील व मी अध्यक्षांना भेटलो. त्यावेळी अध्यक्षांनी आठवड्याच्या आतच नोकरीवर रुजू करून घेतो, असे सांगितले होते. मात्र वडील बाजूला गेल्यानंतर मी अध्यक्षांना म्हटलो, की वडिलांच्या समाधानासाठी आलो आहे. मला उच्च शिक्षण घ्यायचे आहे. मला नोकरीवर घेऊ नका, असे वळसे पाटलांनी स्पष्ट केले.

त्यानंतर मी कायद्याची पदवी संपादन केली. 1990 पासून आज तागायत आमदार, अर्थ, गृह , ऊर्जा, कामगार, वैद्यकीय शिक्षण, सहकारआदी कॅबिनेट मंत्रीपदे व विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. तसेच राज्य सहकारी बँकेचा अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानो जीवनाचा प्रवास निश्चित करताना आपला कल कुठे आहे त्याप्रमाणे वाटचाल करावी, असे संदेशही त्यांनी दिला.

माझ्या आयुष्यातील हे सर्व टप्पे केवळ स्वतः करिअरचा विचार केल्यामुळेच पार पडले, याकडेही दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष वेधले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या हिमतीची दाद दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT