Rekha Thakur : अमोल मिटकरींच्या ऑफरला 'वंचित'चं उत्तर; 'आधी भाजपची साथ सोडा...'

Amol Mitkari Vanchit Rekha Thakur : भाजपसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध ठेवण्यास आमचा विरोधात आहे. असे ठाकूर म्हणाल्या आहेत. तर, मिटकरी यांनी महायुतीमध्येच आम्ही असणार आहोत, असे सांगितले आहे.
Amol Mitkari Vanchit Rekha Thakur
Amol Mitkari Rekha Thakur sarkarnama

Vanchit News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली पाहिजे. अजितदादांनी वंचितसोबत जायचा हवे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला 'वंचित'च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवार यांचा गट भाजपच्या युती मधून बाहेर पडल्याशिवाय सोबत येण्याचा कुठलाही विचार केला जाऊ शकत नाही, असे ठाकूर म्हणाल्या.

भाजपसोबत BJP प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध ठेवण्यास आमचा विरोधात आहे. त्यामुळे अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा आता काही विचार करता येणार नाही,असे ठाकूर म्हणाल्या आहेत. मात्र सकाळी वंचितसोबत जायला हवे असे सांगणारे मिटकरी यांनी महायुतीमध्येच आम्ही असणार आहोत, असे सांगितले आहे.

Amol Mitkari Vanchit Rekha Thakur
Nana Patole on Pune Lok Sabha Result : 'पुण्यात कोणी बदमाशी केली मला माहिती आहे, आताच..' ; संतप्त पटोलेंचा कडक इशारा!

अमोल मिटकरी काय म्हणाले?

समाजकारणात मी बाळासाहेबांना मानत आलो आहे. फुले शाहु आंबेडकरांचे वारसदार बाळासाहेब आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा Ajit Pawar एकत्र यावेत, अशीच माझी इच्छा आहे. आंबेडकर चळवळ राष्ट्रवादी सोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि पुढील राजकारण फार वेगळं असेल, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.

मिटकरींचा यू टर्न

अमोल मिटकरी म्हणाले, पत्रकारांनी मला वंचित बहुजन आघाडी जर आपल्यासोबत आली तर काय भूमिका असेल असा सवाल केला होता.मी त्यांना म्हणालो, जसा काँग्रेस पक्षाने वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तसाच काँग्रेस आणि महाविकास आघाडीने वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा देखील यांना सुध्दा मानाचं स्थान दिलं नाही.महाराष्ट्रात आंबेडकरांचं फार मोठं स्थान आहे.आणि ते जरी भाजप किंवा शिवसेनेच्या विचाराशी सहमत नसतील तरीसुध्दा अजितदादांसोबत आले तर महायुती भक्कम होईल.

Amol Mitkari Vanchit Rekha Thakur
Nitin Raut : नितीन राऊतांचा अनोखा दौरा; थेट आयुक्तांनाच नागपूरची दुर्दशा दाखवली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com