Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar On Dilip Walse : वळसे पाटलांच्या कन्या तुतारीवर लढणार? शरद पवारांनी जाग्यावरच विषय मिटवला

Ambegaon Vidhan Sabha : पिपाणी आणि तुतारीचा निर्णय फक्त राज्यापुरता लागू आहे. देशाची लोकसभा आणि इतर विधानसभा या ठिकाणी हाच निर्णय लागू करायला हवा होता.

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : लोकसभा, विधानपरिषदेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची वातावरणनिर्मिती झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांतील प्रमुख नेत्यांनी राज्याचा दौरा सुरू केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू केलेला आहे.

दरम्यान, नगरमधील अकोलेतून त्यांनी अमित भांगरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता अजित पवार गटाचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वी वळसे तुतारी चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे. यावर विचारले असता पवारांनी हा विषय पक्षातील नेत्यांचा असल्याचे सांगून जास्त बोलणे टाळले.

जुन्नर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी Sharad Pawar राज्य सरकारमधील नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांना आंबेगावातून पूर्वा वळसे पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जाते. त्या तुमच्याकडून लढण्यास इच्छुक आहेत का, असा थेट प्रश्न पवारांना करण्यात आला. यावर पवार म्हणाले, आमच्या बाजूने आमचा निर्णय आमचे स्थानिक नेते घेतील. या पलीकडे आणखी कोणाचे नाव घ्यायची गरज नाही, असे मोजके बोलूनच हा विषय संपवला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पिपाणी चिन्ह गोठवून निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलासा दिला आहे. यावर पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेते. या आयोगाने काल निर्णय घेतला, यापुढे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील. अन्य पिपाणी वगैरे चिन्हावर बंदी घातली आहे. हा अतिशय उत्तम निर्णय झाला आहे. मात्र हा फक्त राज्यापुरता लागू आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी हाच निर्णय लागू करायला हवे होते, असेही त्यानी बोलून दाखवले.

अलिकडे शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची Ajit Pawar सभा होतात, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ही लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्ये माझी सभा आहे. तिथे माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करायची इच्छा आहे. त्यांच्याशी संवाद साधून, त्यांचे पक्षप्रवेश करून घेऊ, असेही पवारांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT