Sharad Pawar : दादांचं टेन्शन वाढलं! आमदार बेनकेंच्या भेटीनंतर पवारसाहेबांचे सूचक विधान; म्हणाले...!

Ajit Pawar Vs Sharad Pawar : जुन्नर,आंबेगाव,खेड या विधानसभा मतदारसंघातील आमदार अजितदादांच्या गटात असतानाही या मतदारसंघातून शरद पवार यांचे उमेदवार डॉ. कोल्हे यांना मताधिक्य मिळाले आणि ते विजयी झाले.
Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Ajit Pawar-Atul Benke-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Junnar News : लोकसभेच्या निवडणुकीत 'राष्ट्रवादीचे ज्यांनी काम केले ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी आमची आहे', असे सूचक विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. जुन्नरचे विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी शनिवारी सकाळी जुन्नर येथे मुक्कामी असलेल्या शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर उपस्थित पत्रकारांनी बेनके यांच्या भेटीबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी हे विधान केले. यामुळे येणाऱ्या काळात आमदार बेनके शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अहमदनगर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी रात्री जुन्नर येथे मुक्कामी होते. शिरूरचे खासदार आणि शरद पवार गटाचे नेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या घरी पवार यांचा मुक्काम होता. जुन्नर येथे मुक्कामी असलेल्या शरद पवार यांची जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शनिवारी सकाळी खासदार कोल्हे यांच्या घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा देखील झाली.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
NCP NEWS : विधानसभा निवडणुकीपूर्वी दादा अन्‌ साहेब एकत्र येऊ शकतात; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे विधान

या चर्चेबद्दल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, आमदार अतुल बेनके कोणत्या गटात आहेत, हे मला माहित नाही. त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. लोक भेटायला येतात, तसेच ते देखील आले होते. त्याचे वडील माझे मित्र होते. त्याचे काही राजकारण होत असेल तर त्याचा त्यावेळी निकाल देऊ त्याची आता चर्चा करायची गरज नाही. साधी गोष्ट अशी आहे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केलं ते आमचे ! त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी असे सूचक त्यांनी केले.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Video Ajit Pawar : पवारसाहेब अन् अतुल बेनकेंच्या भेटीवर अजितदादा थोडक्यातच बोलले; म्हणाले...

लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे शिरुर मधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव स्विकारावा लागला.जुन्नर, आंबेगाव, खेड या विधानसभा मतदारसंघातील आमदार अजितदादांच्या गटात असतानाही या मतदारसंघातून शरद पवार यांचे उमेदवार डॉ. कोल्हे यांना मताधिक्य मिळाले आणि ते विजयी झाले.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार बेनके यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यावर पवारसाहेबांनी दिलेले स्पष्टीकरण चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले यश पाहता त्यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हाती घेतल्यास तो अजित पवार यांना धक्का असू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com