J P Nadd In Pune :
J P Nadd In Pune : Sarkarnama
पुणे

J P Nadda In Pune : 'निकालाची चिंता नाही, विजय आता आपलाच..' ; जे पी नड्डांना विश्वास..

सरकारनामा ब्यूरो

Pune News : महाराष्ट्राच्या राज्यात महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार होते, याच सरकारच्या काळात महाराष्ट्राच विकास खुंटला. विकासाची कामे थांबली. यामुळे महाविकास आघाडी सरकार म्हणजे केवळ महाराष्ट्राचं नुकसान, हे राज्यातल्या गावागावातमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगायला हवे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना म्हंटले.

कोरोनाच्या संकटकाळात सर्व पक्ष आयसीयूमध्ये दाखल होता, पण केवळ भाजपा हा पक्ष सामाजिक काम करण्यात पुढे होता. असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले. पुण्याच्या भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठक पार पडल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप सरकारची कामे पुढे न्यावे, असे ही ते म्हणाले.

जगात मंदीच्या संकटात पण भारत सुरक्षित :

महाराष्ट्रात आलो की आपल्याला उर्जा मिळते. मोदी सरकारच्या काळात देशाचा मोठ्या प्रमाणावर विकास साधला गेला. देशात मागील सत्तर वर्षात ७४ विमानतळे बांधण्यात आली. मोदी सरकारच्या कार्यकाळात मात्र केवळ 9 वर्षांत 74 विमानतळ बांधण्यात आली. हा बदल भारतात घडला आहे. भाजप आणि एनडीएप्रणित सरकारे म्हणजेच विकास आहे. जगाभरात मंदी आली आहे, मात्र या संकटापुढेही भारत मोदी सरकारच्या नीतीमुळे टीकून आहे. भारताला या मंदीच्या झळा पोहचल्या नाहीत. आपल्याकडून देशवासीयांच्या खूपच अपेक्षा आहेत. आज सरकारचा अभिनंदनाचा ठराव केला, त्यासाठी महाराष्ट्र सरकार खरोखर पात्र आहे.

निकालाची चिंता नाही, विजय आपलाच

आम्हाला आता निकालाची कसलीही चिंता नाही. आम्हीच विजयी होणार आहोत. आम्हीच पुढे जाणार आहोत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहतीने आपण पुढे जाणार आहोत. प्रत्येकाने १० लोकं जोडायला हवी, असे केले तर आपले जाळे किती मोठे होईल, हे तुम्हाला दिसून येईल. राज्यात असो की देशात येणार असलेली कोणतीही निवडणूक आता भाजप जिंकणार. सगळ्या ठिकाणी एनडीएचाच विजय होणार, यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे. मोदी सरकार, राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवावी, असे आवाहनबी नड्डा यांनी केले.

आमदारांसोबत बैठकीचे आयोजन :

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सर्व आमदार आणि खासदारांसोबत बैठक पार पडणार आहे. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात या ठिकाणी ही बैठकीचे आयोजन केले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी योजना आणि नियोजन याबाबत चर्चा झाल्यानंतर नड्डा आमदारांना काय कानमंत्र देणार? हे ही पाहणे महत्त्वपूर्ण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT