Karmala News : रणजितदादांशी चर्चेनंतर करमाळ्यातील मोहिते पाटील गटाची ‘मकाई’च्या निवडणुकीत एन्ट्री...

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोहिते पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे भोसले यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
Makai Sugar Factory Election
Makai Sugar Factory ElectionSarkarnama

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोहिते पाटील (Mohite Patil) आणि माजी आमदार नारायण पाटील (Narayanaba Patil) समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे भोसले यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मकाई कारखान्याची निवडणूक लढवण्याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर चार दिवसांपूर्वी अकलूज येथे बैठक झाली असल्याची ही माहिती पुढे आली आहे. (Mohite Patil group in Karmala will contest Makai Sugar Factory election)

जेऊर (ता. करमाळा Karmala) येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी झालेल्या बैठकीत सविताराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सविताराजे भोसले, अजित तळेकर, हरिदास डांगे, माजी सभापती अतुल पाटील, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, महेंद्र पाटील, चंद्रप्रकाश दराडे, चिखलठणाचे हनुमंत सरडे, प्रा. संजय सरडे उपस्थित होते.

Makai Sugar Factory Election
Maharashtra Politic's : कर्नाटकात कळीचा ठरलेला आरक्षण फॅक्टर शिंदे-फडणवीसांची डोकेदुःखी वाढवणार

या वेळी भिलारवाडी येथील बागल गटाचे माजी सरपंच रामचंद्र येडे, माजी सरपंच अंकुशराव पांडुरंग अंबघरे, माजी सरपंच भारत नारायण गिरंजे, बाबूराव काशिनाथ अंबघरे, माजी सरपंच राजू उगलमोगले या बागल समर्थकांनी पाटील गटात प्रवेश केला.

करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावर स्थापनेपासून बागल गटाची एकहाती सत्ता आहे. माजी राज्यमंत्री (कै.) दिगंबररावजी बागल हे स्वतः या कारखान्याचे चेअरमन होते. त्यांच्या नंतर त्यांची कन्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, चिरंजीव दिग्विजय बागल यांनी कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे.

Makai Sugar Factory Election
Solapur News: भाजप नेत्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती स्थिर; 'माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार...'

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत बागल गटाच्या विरोधात कोण निवडणूक लढवेल की नाही अशी परिस्थिती असताना दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा.रामदास झोळ यांनी मकाई बचाव समितीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ते निवडणूक रिंगणात उतरले आणि उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुसंख्य उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

झोळ आणि राजेभोसले एकत्र येणार?

मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ यांनी मकाई बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जेऊर येथे झालेल्या बैठकीनंतर निवडणुकीत वेळगेच चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रा. झोळ यांची भूमिका काय राहणार? झोळ आणि राजेभोसले एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार का याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Makai Sugar Factory Election
Vinod Tawde News: भाजप हायकमांडचे विनोद तावडेंना पाठबळ; फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता!

छाननीनंतर रणनीती ठरवणार : सविताराजे भोसले

मकाई सहकारी साखर कारखाना अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांची देणी मिळत नाहीत. शेतकरीहितासाठी आम्ही मकाईच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व समविचारी शेतकरी सभासद एकत्र येऊन आम्हीही निवडणूक लढवत आहोत. उद्या उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे, असे सविताराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com