Deepak Tilak Passes Away  sarkarnama
पुणे

Deepak Tilak : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

Deepak Tilak Passes Away : दीपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

Roshan More

Deepak Tilak News : 'केसरी'चे विश्वस्त संपादक व लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे आज (बुधवारी) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.

दीपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. टिळक कुटुंबियांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी पुढे चालवला. ते अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेले होते.

2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून श्रद्धांजली

'केसरी'चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, 'केसरी'सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT