Pune ZP News: पुणे जिल्हा परिषदेची सत्ता 'हे' 3 तालुके ठरवणार; राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहणार ?

Pune Politics : राज्य सरकारनं पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी यापूर्वी 2022 मध्ये निश्चित केलेली गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (ता.14 जुलै) रोजी अंतिम केली आहे.
Pune ZP News .jpg
Pune ZP News .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकार आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारनं जिल्हा परिषद गट आणि गण यांची संख्या 2017 च्या निवडणुकीप्रमाणे म्हणजेच पाच वर्षांचा कार्यकाळ संपला, त्यावेळी 2022 ला असलेली गटांची संख्याच कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार आता पुणे जिल्हा परिषदेचे (Pune Zilha Parishad) 73 गट व 146 गण निश्चित करण्यात आले आहेत.

राज्य सरकारनं पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी यापूर्वी 2022 मध्ये निश्चित केलेली गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (ता.14 जुलै) रोजी अंतिम केली आहे. त्यासंदर्भातला अध्यादेशही सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यासाठी जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त 75 आाणि कमीत कमी 50 गट असणार आहेत. तर त्या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे गण असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील 13 तहसील कार्यालयाबरोबरच पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळांवर गट-गण रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

ही प्रारुप रचना 2011 ची जनगणना ग्राह्य धरून तयार करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात आत्तापासूनच इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या प्रारुप गट-गण रचनेवर येत्या 21 जुलैपर्यंत नागरिकांना हरकती सूचना नोंदवता येणार आहे.

Pune ZP News .jpg
Jayant Patil Offer: राजीनाम्यानंतर काही वेळातच जयंत पाटलांना केंद्रातून मोठी ऑफर; म्हणाले, 'जर त्यांना मार्ग बदलायचा असेल, तर...'

राज्य सरकारच्या या नव्या आराखड्यानुसार जुन्नर,खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांचा पुणे जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक सदस्य असणार आहेत. या तीनही तालुक्यांचा प्रत्येकी आठ सदस्य असणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या 73 पैकी 24 सदस्य जुन्नर,खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांतून असणार आहे. तर सर्वात कमी सदस्यसंख्या ही दोन जिल्हा परिषद संख्या राजगड तालुक्यातून असणार आहे.

पुणे महापालिकेमध्ये हवेली व मुळशीतील 23 गावं नव्यानं समाविष्ट झाल्यानं हवेली तालुक्यातील गटांची संख्या सातनं कमी झाली आहे. यात नवीन गट रचनेत जुन्नर,खेड,भोर,दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एका गटाची वाढ झाली आहे.

Pune ZP News .jpg
Chandrapur Bank: चंद्रपूर बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; भाजपनं ठाकरेंचा 'सेनापती'च पळवला; अध्यक्षाची निवड होण्याआधीच डाव टाकला

जिल्हा प्रशासनाने 2011 च्या जनगनणेप्रमाणे आकडेवारी सरकारकडे सादर केली होती. त्यानुसार, पुणे जिल्ह्यातील महापालिका,नगरपालिका,नगर परिषद,नगरपंचायत आणि कटक मंडळी वगळता ग्रामीण क्षेत्रामध्ये 33 लाख 88 हजार 513 ग्रामीण क्षेत्रात लोकसंख्या आहे.

लोकसंख्येची सरासरी काढून हे गट निश्चित करण्यात आले असून त्यात जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील गट संख्येत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. या तालुक्यांतील गट-गणांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.

तसेच वडगाव मावळ,देहू,मंचर आणि माळेगाव येथे नगरपंचायत झाल्यानं ग्रामीण क्षेत्रातून अडीच लाख लोकसंख्या कमी झाली. यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्यानं गटाची दोन व गणांची संख्या चारनं कमी झाली आहे, तर हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल सातनं कमी झाली आहे.

Pune ZP News .jpg
Jayant Patil : माझ्याविरोधात अनेक कुरघोड्या झाल्या... जयंत पाटलांनी जाता जाता सल बोलून दाखवली, पण साथ न सोडण्याचाही शब्द दिला!

पुणे जिल्हा परिषदेची सत्तेचा कौल कुणाच्या पारड्यात द्यायचा हे तीन तालुक्यांच्या हाती असणार आहेत. राज्यात महायुती एकत्र सत्तेत असली तरी असून पुण्यात जिल्ह्यात भाजप,अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आगामी महापालिका, पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी जोर लावण्याची शक्यता आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती एकत्र लढण्याची शक्यता आहे. अशातच एकेकाळी राष्ट्रवारी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख होती. पण आता अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली गेली आहे. तर दुसरीकडे भाजपची ताकद वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे आता पुणे जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक चुरशीची होणार आहे. पुन्हा एकदा पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा 'दबदबा'राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune ZP News .jpg
Radhakrishna Vikhe And Hemant Ogale : काँग्रेसेचा एकमेव आमदार मंत्री विखेंशी घेतोय जुळवून? 'स्थानिक'ला राजकीय गणित बिघडणार?

पुणे जिल्ह्यातील गट-गण फेरबदल

तालुका नवीन गट नवीन गण

जुन्नर 08 16

आंबेगाव 05 10

शिरूर 07 14

खेड 08 16

मावळ 05 10

मुळशी 03 06

पुणे जिल्ह्यातील गट-गण फेरबदल

तालुका नवीन गट नवीन गण

हवेली - 06 12

दौंड - 07 14

पुरंदर - 04 08

वेल्हा - 02 04

भोर - 04 08

बारामती - 06 12

इंदापूर - 07 16

एकूण - 73 146

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com