Lalit Patil  Sarkarnama
पुणे

Lalit Patil News : ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी सुनील तांबेंकडे; 'ससून' डीनपासून शिपायांपर्यंत...

Pune Police : ससूनच्या डीनपासून शिपायापर्यंत अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Pune : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले आहे. ललितच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या ललितला शोधण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे.

बंडगार्डन पोलिस ठाण्यात ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांना नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या ससूनच्या डीनपासून शिपायापर्यंत अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

ससून रुग्णालयात ललित पाटील उपचार घेत होता. येथून तो आपले रॅकेट चालवीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 'ससून'मध्ये ललितला अमली पदार्थ देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल आणि ससूनच्या उपाहारगृहातील कामगार रौफ शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोन ऑक्टोबरला पोलिसांना गुंगारा देऊन ललित पाटील पसार झाला आहे.

बलकवडे याच्या नाशिक येथील घरावर छाप्यात पोलिसांनी तीन किलो सोने जप्त केले आहे. ललिलच्या कुटुंबीयांची चौकशी नाशिक, पुणे पोलिस करीत आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार केली आहेत.

या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यात 2 अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT