Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील शासकीय ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच दोन कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या जप्त केलेल्या मेफिड्रोन ड्रग्जची किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन तरुणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील एका तरुणाचे नाव ललित पटेल असे असून, त्याच्यासोबत आणखी दोघे जण या रॅकेटमध्ये असल्याचीही प्राथमिक माहिती आहे. ललित पटेलला ड्रग्ज तस्करीप्रकरणी यापूर्वीही पोलिसांनी अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली होती.
धक्कादायक म्हणजे, वैद्यकीय उपचारासाठी ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरूअसतानाही त्याने हा सर्व प्रकार कसा केला, याचा आता पोलिस तपास करत आहेत. दुसरीकडे ससून रुग्णालयातीलच कोणा कर्मचाऱ्याचा यात सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Crime News)
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात खून, हाणामारी, हल्ले, असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. पण ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच दोन कोटींचे ड्रग्ज सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरात गुन्हेगारीसोबतच अमली पदार्थांच्या माध्यमातून तरुणाई गुन्हेगारीच्या मार्गावर तर गेली नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.