India Vs Canada : भारत-कॅनडाचा तणाव ब्रिटेनमध्ये; खलिस्तानवाद्यांची भारतीय उच्चायुक्तांच्या वाहनाशी झटापट

Britain Gurudwara : स्कॉटलँडमधील ग्लास्गोमधील गुरुद्वारात जाण्यापासून अधिकाऱ्याला रोखले
Indian Officer in Britain
Indian Officer in Britain Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता ब्रिटनमध्येही दिसून येत आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानी अतिरेक्यांनी स्कॉटलंडमधील ग्लास्गोमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला. कॅनडात दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे उभय देशांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच ब्रिटेनमधील घटनेने भारत आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

विक्रम दोराईस्वामी यांना गुरुद्वारात प्रवेश करण्यास नकार देऊन परत पाठवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक खलिस्तानी समर्थक दोराईस्वामी यांना ग्लास्गो येथील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखताना दिसत आहे. दोराईस्वामी पार्किंगमध्ये असताना दोन लोक तेथे येतात. त्यातील एक जण कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर उच्चायुक्तांची गाडी गुरुद्वाराच्या परिसरातून बाहेर पडताना दिसते. (International Political News)

Indian Officer in Britain
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कुणाची? जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, 'ते खरे बोलतात...'

दरम्यान, ग्लास्गो येथील गुरुद्वाराच्या व्यवस्थापन समितीने भारतीय उच्चायुक्त दोराईस्वामी यांना आमंत्रित केले होते. यानंतर व्हिडिओत खलिस्तानी अतिरेक्यांनी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या कर्मचार्‍यांना धमकावल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा भारत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण उच्चायुक्तांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे सूत्रांचे माहिती आहे. भारतीय उच्चायुक्तासंबंधी घडलेल्या प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावरून व्यक्त होत आहे. (Maharashtra Political News)

Indian Officer in Britain
Shrirang Barne Maval : खासदार श्रीरंग बारणे १२ वर्षांनंतर दोषमुक्त; काय आहे प्रकरण?

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल कॅनडावर जोरदार हल्ला चढवला होता. अमेरिकेत ते म्हणाले, कॅनडा हे दहशतवादी आणि अतिरेक्यांचे आश्रयस्थान बनले आहे. त्यांच्या या विधानानंतर शनिवारी ठोस पुरावाही समोर आला आहे. खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डल्लाचा कॅनडात बसलेला एक ऑडिओ समोर आला आहे. त्यात तो पंजाबमधील व्यावसायिकास धमकी देऊन पैशांची मागणी करत आहे.

कॅनडात बसून खलिस्तानी दहशतवादी पंजाबमध्ये कशी दहशत पसरवत आहेत. अर्शदीप कॅनडामध्ये बसून पंजाबमधील मोठे व्यापारी, कंत्राटदार, गायक आणि मद्यविक्रेत्यांकडून खंडणी घेतात. यातून त्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. कॅनडा खलिस्तानी दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात आणि पंजाबमध्ये आपली टोळी मजबूत करण्यात गुंतला आहे. त्यांचे हे प्रकार अजूनही सुरूच असल्याचा घणाघातही भारताने केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Indian Officer in Britain
Shrikant Shinde Rifle Shooting : रायफल शूटिंगमध्ये श्रीकांत शिंदे तरबेज; राजकारणात कुणाचा गेम करणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com