Maratha Reservation News : कोल्हापूरमध्ये पेटणार मराठा आरक्षणाची मशाल, शहरात बॉलिवूड स्टाइल पोस्टरबाजीची चर्चा !

Kolhapur Maratha Reservation Protest : बॉलिवूड स्टाइल पोस्टरबाजीची शहरभर चर्चा...
Kolhapur
Kolhapur Sarkarnama
Published on: 
Updated on: 

राहुल गडकर -

Kolhapur News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता कोल्हापुरातील शिवाजी पेठ भागाने वज्रमूठ आवळली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतून जे घडते ते राज्याचे समीकरण बनते, असे सांगितले जाते. यामुळे आता उद्यापासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समजाकडून शहरात बॅनर झळकवले आहेत. (Latest Marathi News)

Kolhapur
NCP-BJP Politics : 'बारामती अॅग्रो'वर कारवाई : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा भाजपाला खुला इशारा; याचं उत्तर लवकरच देऊ...

मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावं, शासकीय नोकऱ्यांतील खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज शिवाजी पेठच्या वतीने सोमवारी गांधी जयंतीदिनी उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. उभा मारुती चौकात सकाळी १০ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात येणाऱ्या आंदोलनात मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यात सध्या विविध समाजाची आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजाचे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी पुन्हा संघटित होऊन ताकदीने आंदोलन करण्याची तयारी राज्यात सुरू झाली आहे. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण कसे देणार? यावर राज्य सरकार मूग गिळून गप्प आहे, असा आरोप आंदोलनाचे प्रमुख चंद्रकांत यादव यांनी केला.

Kolhapur
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कुणाची? जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, 'ते खरे बोलतात...'

मराठा समाजाची मागणी मुख्यतः शैक्षणिक सवलती आणि शासकीय नोकऱ्यांसाठी आहे. आरक्षणाची मागणी सुरू असतानाच राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय सेवेतील नोकऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा आदेश काढला आहे. त्यासाठी नऊ खासगी कंपन्या नियुक्त केल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात शाळा खासगी संस्थांना चालविण्यास देणे, दत्तक देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. शाळांचे खासगीकरण झाल्यास शैक्षणिक आरक्षण मिळणे बंद होणार आहे, त्यामुळे हा लढा उभारत असल्याचं यादव यांनी सांगितलं.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.